Press "Enter" to skip to content

गणेशमूर्तींच्या तोडफोडीचा व्हिडीओ ‘बहरीन’चा; पण धार्मिक तेढ निर्मितीचा प्रयत्न भारतात!

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलाय. जगभरातील गणेशभक्त मोठ्या आतुरतेने वाट बघताहेत. अशातच एक बुरखाधारी महिला एका दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या गणेशमूर्तींची तोडफोड (Lord ganesha idols vandalizing) करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सनातनी अनिल सिंह असे नाव लिहिलेल्या ट्विटर युजरने सदर व्हिडीओ शेअर करून काय कॅप्शन लिहिलेय बघा:

“पैगम्बर के लिए बेंगलुरु जला, सनातनियों के घर,दुकान,मकान,गाड़ी तक को धर्म के नाम पर फुक दिया गया. अब हमे क्या मुल्ले के साथ पूरे देश में बेंगलुरु वाला सीन करना नही चाहिए? क्या गणेश भगवान की मूर्ति के साथ जो अभद्रता की गई उसके लिए जिहादियों की गर्दन धड़ से अलग नही करनी चाहिए?”

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

‘दीपक सोनी अमेठी’ लिहिलेल्या ट्विटर युजरनेही हा व्हिडीओ शेअर केलाय आणि लिहिलंय:

“किसी MALL में गणेशजी की मूर्तियां रखी थी तो मुस्लिम महिला ने उठाकर पटक दिया। जब गणेश जी मूर्ति से इसे इतनी तकलीफ़ हे उन मोलानाओ को कितनी होती होगी और अंधे बहरे लोग कहते है कि *हिन्दू मुस्लिम भाई भाई*मुस्लिम काफिर को कभी भी भाई नहीं मान सकता हिंदू भाइयों अब अपनी अक़्ल का ताला खोलो”

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ नीटसा ऐकला तरी लक्षात येईल की ही भाषा भारतीय नाही. कुठल्या तरी आखाती देशातील आहे. म्हणूनच ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीस सुरुवात केली.

व्हायरल व्हिडिओ संदर्भात आम्ही Lord ganesha idols vandalizing या किवर्डसह सर्च केले असता हाच व्हिडिओ अनेकांनी व्हायरल केल्याचे दिसून आले. परंतु अनेकांत समान धागा असा होता की त्यांनी ही सदर घटना ‘बहरीन’ देशात घडल्याचे लिहिले होते.

त्याचबरोबर विविध राष्ट्रीय माध्यमांनीसुद्धा याविषयी बातम्या केल्याचे दिसून आले. या सर्वांनी सदर घटना बहरीनमध्येच घडली असल्याचे म्हंटले आहे.

सर्वच बातम्यांमध्ये हा व्हिडीओ बहरीनमधील असल्याचे सांगितल्याने बहरीनने या घटनेवर काही अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे का याचा आम्ही शोध घेतला. बहरीनच्या ‘Ministry of Interior’ ने आपल्याया अधिकृत ट्विटर हँडलवर याविषयी केलेले ट्विट आम्हाला सापडले.

बहरीनच्या गृहखात्याच्या या ट्विट नुसार व्हायरल व्हिडिओ बहरीनची राजधानी मनामा शहरातील जफर मार्केट मधला आहे. दुकानाचे नुकसान करणाऱ्या आणि धार्मिक बदनामी करणाऱ्या ५४ वर्षीय महिलेविरोधात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले आहे.


‘हा महमद बिन इसांचा देश असून त्यांची याला मान्यता असेल का? असे अरबी भाषेत दुकानदाराला विचारात बुरखाधारी महिलेने दुकानातील गणेशमूर्तींची तोडफोड केली. अशी माहिती आम्हाला ‘न्यू स्ट्रेट्स टाईम्स’ या वृत्तपत्रातील बातमीतून समजले.

याच बातमीत असेही लिहिलेय की बहरीनच्या राजाचे सल्लागार आणि माजी परराष्ट्र मंत्री ‘खालिद-उल-खलिफा’ यांनी सदर घटनेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय. ते म्हणतायेत की,

‘धार्मिक प्रतिमांची मोडतोड करणे हा बहरीन देशाचा स्वभावच नाहीये. हा एक गुन्हा आहे जो द्वेष व्यक्त करतो. बहारीनमध्ये सर्व धर्म आणि पंथाचे लोक समभावाने राहतात आणि हे असले कृत्य करणारे कुणी नवखे, बाहेरचे नाहीत.’

bahrain khalid a khalifa tweet

बहरीनमधील भारतीय दुतावासाने या घटनेमुळे दोन्ही देशांतील संबंध कलुषित होऊ नये याची काळजी घेत ‘खालिद-उल-खलिफा’ यांचे ट्विट रीट्विट करत त्याचा इंग्रजी अनुवाद लिहिला आहे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘ने केलेल्या पडताळणीनूसार मुस्लीम महिलेद्वारे गणेशमूर्तींची तोडफोड करण्यात येणारा व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही. तो बहरीन देशातल्या मनामा शहरातील आहे.

बहरीन सरकारच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या प्रकरणातील दोषी महिलेवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. तेथील राष्ट्रीय नेत्यानेसुद्धा या कृत्याविषयी निषेध नोंदवला आहे.

बहरीन हे मुस्लीमबहुल राष्ट्र असले तरीही तिथे सर्व धर्मपंथ एकोप्याने राहतायत. या संस्कृतीवर घाला घालणाऱ्या, इतर धर्मियांच्या भावना दुखावणारे कृत्य करणाऱ्या महिलेवर कायद्याचा बडगा उगारू शकतात ही या घटनेची महत्वाची वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा: ‘बाबरी हॉस्पिटल बनणार, डॉ. काफील खान संचालक असणार’ सांगणारे व्हायरल मेसेज फेक!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा