Press "Enter" to skip to content

व्हायरल व्हिडिओत भाजपवर टीका करणारी महिला अटल बिहारी वाजपेयींची पुतणी नाही!

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला भाजपवर टीका करत असतानाचा बघायला मिळतेय. ही महिला भाजपला निवडून दिल्याबद्दल आपल्याला पश्चाताप होत असल्याचे सांगताना भाजपवर विश्वास ठेवणे ही आमची आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी चूक असल्याची कबुली देतेय. दावा करण्यात येतोय की सदर महिला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची पुतणी मान्यता वाजपेयी आहेत.

Advertisement
Source: Facebook

काँग्रेस नेत्या नगमा मोरारजी (Nagma Morarji) यांनी देखील हाच व्हिडीओ साधारणतः अशाच दाव्यासह शेअर केला होता. नगमा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहितात,

“अटलजींच्या पुतणी सांगताहेत की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशाचे तुकडे करण्याचा कट रचला जात आहे. भाजप आणि आरएसएसकडून गोदी मीडियाच्या मदतीने देशाची एकता आणि अखंडता संपूष्टात आणण्याचा घाट घातला आहे.”

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओमध्ये सदर व्हिडीओचे क्रेडिट्स ‘HNP News’ला देण्यात आलेले आहे. याआधारे युट्युबवर शोध घेतला असता ‘HNP News’च्या युट्युब चॅनेलवरून 3 जानेवारी 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला जवळपास 14 मिनिटांचा व्हिडीओ मिळाला.

व्हिडीओ जंतर मंतर वरील सीएए (CAA) कायद्याविरोधातील आंदोलना दरम्यानचा असून व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेचे नाव अतिया अल्वी आहे. अतिया अल्वी सामाजिक कार्यकर्त्या असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये 1 मिनिट 37 सेकंदाच्या फ्रेममध्ये त्यांच्याविषयीची माहिती मिळते.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतणीचे नाव मान्यता नाही तर करुणा शुक्ला (Karuna Shukla)असे होते. करुणा शुक्ला यांचे 27 एप्रिल 2021 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालेले आहे.

करुणा वाजपेयी यांनी 2013 सालीच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. करूणा शुक्ला 2 वेळा खासदार राहिल्या आहेत. त्यांनी 2018 मध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग (Raman Singh) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. या लढतीत त्यांचा पराभव झाला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये केंद्र सरकारवर टीका करणारी महिला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी मान्यता नाही, तर सामाजिक कार्यकर्त्या अतिया अल्वी आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला यांचे एप्रिल 2021 रोजी निधन झाले असून त्या 2013 पासून काँग्रेसच्या सदस्य होत्या.

हेही वाचा- ठाकरे सरकारने 10 वी, 12 वी परीक्षेच्या फॉर्मवरील ‘हिंदू’ शब्द काढून टाकलाय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा