Press "Enter" to skip to content

शाहिनबागच्या आंदोलनातील दादी पंजाबी शेतकरी बनल्याचा कंगना राणावतकडून फेक दावा

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत धडाकल्यानंतर आता या आंदोलनाच्या संदर्भाने अनेक अफवा पसरवल्या जाताहेत. सोशल मीडियावर दोन वयोवृद्ध महिलांचा फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की शाहिनबागच्या आंदोलनातील दादी बिल्किस बानो आता शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबी शेतकरी म्हणून सहभागी (shaheen bagh dadi at farmers protest) झाल्या आहेत.  

Advertisement

अभिनेत्री कंगना राणावत हिने एका ट्विटर युजरने शेअर केलेला फोटो रिट्विट करत टाईम मासिकाच्या १०० प्रभावशाली भारतीयांच्या यादीतील दादी १०० रुपयांमध्ये विकली गेल्याचा दावा केला.

Source: Twitter

सातत्याने फेक न्यूज शेअर करत असलेल्या गौरव प्रधान यांनी देखील हा फोटो ट्विट केलाय. शाहीनबागच्या आंदोलनातील दादी भाड्याने उपलब्ध असून त्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसशी संपर्क साधा, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. हे ट्विट १००० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल फोटोची पडताळणी करताना आम्हाला ‘बूम लाइव्ह’चा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्नुसार बिल्किस बानो यांचा मुलगा मंजूर अहमद यांनी स्वतः बूमशी बोलताना व्हायरल फोटोतील महिला आपली आई नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आपण या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याच्या विचारात आहोत, मात्र बिल्किस बानो मात्र अद्यापपर्यंत आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

‘बूम’ने बिल्किस बानो यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यावेळी बिल्किस बानो म्हणाल्या, ” मी सध्या माझ्या शाहीन बागेतील घरीच आहे. फोटोमधील महिला मी नाही (shaheen bagh dadi at farmers protest). मात्र मी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी होणार आहे”

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता ‘संत बाबा जर्नेलसिंगजी खालसा भिंद्रावाले’ या फेसबुक पेजवरून १३ ऑक्टोबर २०२० रोजी हा फोटो अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. येथेच हा फोटो सध्याचा नसून साधारणतः दीड महिन्यांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले.

ਏਸੇ ਹੀ ਅੰਬਰ ਦੇ ਵਿਚਉੱਡਦੇ ਕਦੇ ਬਾਜ ਹੁੰਦੇ ਸੀ ਏਸੇ ਹੀ ਧਰਤੀ ਉੱਤੇ ਸਾਡੇ ਕਦੇ ਰਾਜ ਹੁੰਦੇ ਸੀ ਦਿੱਲੀ ਤੋਂ ਦਬਕੇ ਜੇ ਹੁਣ ਬਣ ਕੇ ਘਸਿਆਰੇ…

Posted by Sant Baba Jarnail Singh Ji Khalsa Bhindrawale on Monday, 12 October 2020

वस्तुस्थिती:

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोशी शाहीनबागच्या दादी बिल्किस बानो यांचा काहीएक संबंध नाही. स्वतः बिल्किस बानो यांनीच हा दावा फेटाळून लावला आहे.

फोटो सध्याचा नसून साधारणतः दीड महिन्यांपूर्वीचा आहे. दरम्यान आपला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असून आपण शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचं मात्र बिल्किस बानो यांनी स्पष्ट केलं आहे. 

हे ही वाचा- ‘शेतकरी आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, खलिस्तान जिंदाबादचे नारे’ भाजप नेत्यांचे दावे किती खरे?

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा