Press "Enter" to skip to content

रशिया विरोधात लढण्यासाठी युद्धभूमीवर उतरल्या युक्रेनच्या उप-राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी?

सोशल मीडियावर लष्करी गणवेशातील शस्त्रसज्ज महिलेचा फोटो व्हायरल होतोय. ही महिला युक्रेनच्या उप-राष्ट्राध्यक्षांची पत्नी असून ती आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी युद्धभूमीवर उतरली असल्याचे सांगण्यात येतेय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता फोटो स्टॉक वेबसाईट अलामीच्या वेबसाईटवर आम्हाला हा फोटो बघायला मिळाला. फोटोसोबत देण्यात आलेल्या माहितीनुसार हा फोटो 22 ऑगस्ट 2021 रोजी युक्रेनची राजधानी किवमधील स्वातंत्र्य दिन परेडच्या रंगीत तालमी दरम्यान घेण्यात आला होता. कीव येथील फोटोग्राफर वोलोडिमिर झाखारोव्ह यांनी हा फोटो घेतला होता.

फोटोतील महिला नेमकी कोण आहे याची माहिती मिळत नाही. फोटोसोबतच्या माहितीत त्या महिलेचा उल्लेख ‘युक्रेनिअन महिला सैनिक’ असा करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीवरून हा फोटो सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धादरम्यानचा नाही एवढे मात्र स्पष्ट होते.

त्यानंतर आम्ही युक्रेनचे उप-राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. युक्रेन सरकारच्या वेबसाईटवरील माहितीनुसार युक्रेनमध्ये उप-राष्ट्रपतींचे पदच अस्तित्वात नाही.

सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या युक्रेनला 1991 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. युक्रेनचे मतदार पाच वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्राध्यक्ष निवडतात. पंतप्रधान हे युक्रेनियन सरकारचे प्रमुख असतात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांची नियुक्ती करतात.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटो सध्याच्या युद्धजन्य युक्रेनमधील नसून साधारणतः सहा महिन्यांपूर्वीचा आहे. फोटोत दिसणारी महिला एक युक्रेनिअन सैनिक आहे. शिवाय युक्रेनमध्ये उप-राष्ट्रपतींचे पदच अस्तित्वात नाही. त्यामुळे ही महिला युक्रेनच्या उप-राष्ट्रपतींची पत्नी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हेही वाचा- रशिया विरोधातल्या युद्धात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की स्वतः उतरले युद्धभूमीवर?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा