Press "Enter" to skip to content

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरात काय बदललं हे सांगणारी तरुणी नेमकी आहे तरी कोण?

सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा (yana mirchandani) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ३ मिनिटं ४१ सेकंदाच्या या व्हिडिओत ही तरुणी काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर काश्मिरात नेमकं काय काय बदललं आणि कुठली विकासकामे सुरु झाली याविषयी माहिती देतेय.

Advertisement

*धारा 370 हटाने के बाद कश्मीर में क्या नया हो रहा है…. सुने कश्मीरी युवती से ? भारत के हर कोने तक ये पहुँचे !! पुरा सुने !!*

Posted by Kuldeep Gahlot on Wednesday, 21 October 2020

कलम ३७० हटविण्याच्या वर्षपूर्तीनंतर अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करताना खेर यांनी ही तरुणी ज्या स्पष्टतेने आपले म्हणणे मांडत आहे, त्यामुळे आपण प्रभावित झालो असल्याचं म्हंटलं होतं. आपल्याला तिचं नाव जाणून घ्यायला आणि वैयक्तिकरित्या तिचं अभिनंदन करायला आवडेल असंही खेर यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हंटलं होतं.

Aupam Kher shared video of girl telling about benifits of removing article 370
Source: Facebook

सोशल मीडियावर कलम ३७० हटविण्याच्या निर्याणाच्या समर्थकांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. मोठ्या म्हणजे किती मोठ्या प्रमाणात याचा अंदाज घ्यायचा असल्यास ‘*धारा 370 हटाने के बाद कश्मीर में क्या नया हो रहा है…. सुने कश्मीरी युवती से !! हे वाक्य फेसबुक सर्चबार मध्ये टाकून व्हिडीओज सर्च करा.

Kashmiri girl about Article 370 viral video of facebook checkpost marathi
Source: Facebook

या तरुणीचे व्हिडीओ व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अंबादास जरारे यांनी निदर्शनास आणून दिले.

ही तरुणी नेमकी आहे तरी कोण ?

व्हायरल व्हिडिओतील तरुणी नेमकी कोण हे शोधलं असता आम्हाला ‘इंडिया टुडे’चा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार व्हायरल व्हिडिओतील तरुणीचं नाव सुहानी याना मिरचंदानी असं आहे.

ही तरुणी सर्वप्रथम वर्षभरापूर्वी प्रकाशझोतात आली होती.

गेल्या वर्षी काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर या तरुणीने केंद्र सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ एक व्हिडीओ रिलीज केला होता. भाजप नेते राम माधव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

नंतरच्या काळात ही तरुणी खरंच काश्मिरी मुस्लिम आहे किंवा नाही यासंदर्भात गोंधळ निर्माण झाला होता. मिरचंदानी (yana mirchandani) या नावामुळे ती सिंधी असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला होता. परंतु आपण काश्मीरमधील सोनमर्ग येथून असून आपले पूर्वज पाकिस्तानातील सिंध प्रांतातील असल्याचं या तरुणीने ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितलं होतं. 

जन्म काश्मीरमधला असला तरी आपण बराच काळ काश्मीर आणि भारताच्या बाहेर घालवला आहे. आपले कुटुंबीय काश्मिरात राहतात आणि आपण कधीतरी काश्मिरात जातो. सध्या आपण मुंबईत राहत असून हॉंगकॉंगमधील एका कंपनीत कार्यरत असल्याचं तिने साधारणतः वर्षभरापूर्वी सांगितलं होतं. आपण मुस्लिम समाजात जन्मलो असलो तरी, नंतर आपण सनातन धर्म स्वीकारल्याचा दावा ‘याना’ यांनी केला होता.

दरम्यान, ‘इंडिया टुडे’कडून यानाच्या धर्मासंबंधी अगर जन्मस्थानासंबंधी पुरावा मागितला गेला असता, तो देण्यास मात्र याना यांनी नकार दिला होता. याना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या मोठ्या चाहत्या आहेत. यासंबंधीचे बरेच ट्वीटस त्यांनी केले होते. शिवाय त्यांच्या अकाऊंटवरून वेळोवेळी अनेक फेक न्यूज शेअर करण्यात आल्या होत्या.

सध्या मात्र याना यांचं हे ट्विटर अकाउंट ट्विटरकडून सस्पेंड करण्यात आलंय.

आम्ही अजून उत्खनन केलं असता आम्हाला याना मीर नावाचं युट्यूब चॅनेल मिळालं. या चॅनेलवर मिरचंदानी (yana mirchandani) यांचे अनेक व्हिडीओज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सध्या त्या अनेक न्यूज चॅनेलवरील चर्चांमध्ये देखील ‘पत्रकार’ म्हणून सहभागी होताहेत. ‘सीएनएन न्यूज’वरील चर्चेत राजकीय विश्लेषक म्हणून सहभागी झाल्याचा व्हिडीओ आपण येथे बघू शकता.

गमतीचा भाग असा की ज्या ‘इंडिया टुडे’ ग्रुपने वर्षभरापूर्वी याना मिरचंदानी यांच्या अनेक संशयास्पद गोष्टींचा भांडाफोड केला होता. त्याच ‘इंडिया टुडे’चे हिंदी न्यूज चॅनेल असणाऱ्या ‘आज तक’च्या दंगल या कार्यक्रमात मिरचंदानी यांना पत्रकार म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

याना यांच्याविषयीची माहिती बरीच गोंधळ निर्माण करणारी आहे. काश्मिरातून कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर अचानकपणे झालेला त्यांचा उदय आणि त्यानंतरच्या काळातील राष्ट्रवादी काश्मिरी मुस्लिम तरुणी अशा पद्धतीने निर्माण करण्यात आलेलं चित्र याविषयी देखील बरीच संशयाची परिस्थिती आहे. स्वतः मिरचंदानी याच यासंबंधीचे पुरावे देऊन त्यांच्या नावासंबंधीच्या वाद-विवादांवर पडदा टाकू शकतात.

हे ही वाचा-  खरंच पाकिस्तानातल्या कराचीमध्ये ‘तिरंगा’ फडकविण्यात आला?

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा