Press "Enter" to skip to content

सुशांत सिंह राजपूतच्या हत्येची कबुली देणाऱ्या व्हिडीओतील ‘आदित्य ठाकरे’ आहे तरी कोण?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक तरुण आपण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या केली असल्याची कबुली देत असल्याचे बघायला मिळतेय. एवढंच नाही तर तो तरुण स्वतःची ओळख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अशी सांगतोय.

Advertisement

“आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा आणि महाराष्ट्राचा क्रीडामंत्री आदित्य ठाकरे असल्याचे हा तरुण सांगतोय. आपण ठाकरे असून आपलं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही. मुंबई पोलीस माझ्याच उपकारावर जगत आहे. सगळे सेलिब्रिटी माझ्याच इशाऱ्यावर नाचतात. तुम्हीच माझ्या वडलांना मुख्यमंत्री बनवलंत. आता भोगा. हीच तुमची लायकी आहे.” अशा प्रकारे हा तरुण व्हिडिओमध्ये अगदी मनाला वाट्टेल ते बरळत आहे. अनेकांविषयी अपमानजनक भाषेत बोलत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

व्हायरल व्हिडिओत माथेफिरूसारख्या गोष्टी करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे साहिल चौधरी (Sahil Choudhary) तो हरियाणातील फरिदाबादमधील युट्युबर आहे.  मुंबई पोलिसांनी सप्टेंबर 2020 मध्ये साहिल चौधरीला अटक केली होती. महिलांविषयी अपमानजनक वक्तव्य करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

साहिल चौधरीच्या अटकेनंतर त्याच्या सुटकेसाठी सोशल मीडियावर कॅम्पेन देखील चालवण्यात आले होते. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने या प्रकरणी साहिल चौधरीला पाठिंबा दिला होता. याप्रकरणी कंगनाने महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.

kangna ranaout in the support of sahil chaudhari news screenshot
Source: live Hindustan

नंतरच्या काळात साहिल चौधरीला जामीन मिळाला. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर साहिल चौधरीने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते. तसेच मुंबई पोलिसांचे देखील आभार मानत सगळे चांगले असून सगळ्यांचं भलं व्हावं, अशी कामना व्यक्त केली होती.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय तपास कुठपर्यंत पोहोचलाय?

सुप्रीम कोर्टाने १९ ऑगस्ट २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीस मंजुरी दिली होती. मात्र तेव्हापासून आतापर्यंत याप्रकरणी सीबीआयच्या हाती काहीही ठोस लागलेलं नाही. प्रकरणात चार्जशीट देखील दाखल करण्यात आलेली नाही.

मुंबईत कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांकडून सुशांत प्रकरणातील सीबीआय अधिकाऱ्यांची बदली करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करताना पटना हायकोर्टाने ६ सप्टेंबर रोजी सरकारला स्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा-  आदित्य ठाकरे यांचे जुने पोस्टर्स चुकीच्या दाव्यांसह व्हायरल!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘च्चेयाकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा