Press "Enter" to skip to content

‘स्मोकर्स लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका’ WHOने सांगितली स्पष्ट कारणे

कोरोना व्हायरस संबंधीचे नवनवीन दावे रोजच सोशल मिडीयावर व्हायरल होत असताना दिसतात. सध्या ‘सिगारेट ओढणाऱ्यांना कोव्हीड-१९ होऊ शकत नाही’ असा दावा करताना कुणी फ्रान्सच्या शास्त्रज्ञांचा दाखला देत आहे तर कुणी ‘रुग्णालयात कोव्हीड-१९चा इलाज करून घेण्यासाठी दाखल झालेल्यांत स्मोकर्स कमी’ असल्याची बातमी

Advertisement
शेअर करत आहे.

‘जर मी स्मोक करताना फुफ्फुसात ४००० केमिकल टाकत असेल तर त्यात कोरोना व्हायरस जिवंत राहण्याची शक्यता तरी आहे का?’ असा खडा सवाल उपस्थित करत स्वतःच्या सिगारेट पिण्याचं समर्थन करणारे देखील आहेतच .

पडताळणी:

कोरोनाविषयक सर्वाधिक खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहिती देणारा स्रोत म्हणजे WHO. त्यामुळेच स्मोकर्स आणि कोरोना यांच्यात खरंच काहीएक संबंध आहे का हे तपासण्यासाठी आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नेमकं याविषयी काय म्हणतेय हे बघितलं. त्यावेळी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आम्हाला या दाव्यासंदर्भात काही माहिती सापडली.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ट्वीटनुसार २९ एप्रिल २०२०ला सार्वजनिक आरोग्यविषयक तज्ज्ञांनी WHOला जो अहवाल सादर केलाय त्यात धुम्रपान करणाऱ्यांना कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याचीच पुष्टी करताना दुसऱ्या एका ट्विट मध्ये त्यांनी असं म्हटलंय की सिगारेट ओढल्याने फुफ्फुस कमकुवत होऊन कोरोना व्हायरसशी लढण्याची त्याची ताकद कमी होते. एवढेच नव्हे तर तंबाखूमुळे हृदयरोगाचे चान्सेस वाढतात. कॅन्सर, श्वसनाचे आजार आणि इतर कोरोनाव्यतिरिक्त असणारे आजार होऊन कमजोर झालेल्या शरीरावर कोरोना व्हायरस सहज आघात करू शकतो.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट’च्या पडताळणीत आम्हाला स्मोकर्स आणि कोरोना व्हायरसमधील सहसंबंध तर सापडला, पण हा सहसंबंध सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांच्या अगदी उलट आहे. म्हणजेच काय तर सिगारेट तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवू शकत नाही, तर सिगारेटमुळे तुम्हाला असणारा कोरोनाचा धोका अतिशय मोठ्या प्रमाणात वाढतो.  

सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीच्या कमजोर फुफ्फुसाला कोरोना व्हायरस विरुद्ध लढणे अवघड जाते. त्यामुळे अशा व्यक्तींना धोका जास्त आहे. तंबाखूमुळे इतर रोग बळावण्याची शक्यता आहेच, अशा व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमी असल्याने कोरोना व्हायरसला त्यावर हल्ला करणे जास्त सोपे आहे. त्यामुळे सिगारेट पिणाऱ्यांना कोरोना होऊ शकत नाही म्हणणाऱ्याचे सर्व दावे निराधार आणि खोटे ठरतात. अशा फसव्या, अहितकारक दाव्यांना आम्ही ‘चेकपोस्ट’वर सक्त ताकीद देऊन अडवत आहोत.

हे ही वाचा – गरम पाणी किंवा कडक ऊन कोरोना व्हायरस पासून वाचवू शकत असल्याचे दावे खोटे

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा