Press "Enter" to skip to content

चक्क अंड्याची शेती? वाचा चकित करणाऱ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य!

पाकिस्तानचा एक व्हिडिओ जगभर सोशल मीडियात व्हायरल होतोय. यामध्ये एक शेत दिसत आहे, त्यातील झाडांना अंडी लगडली आहेत. विशेष म्हणजे बातमी करणारा पत्रकार आणि शेतकरी ती अंडी फोडूनही दाखवत आहेत. दावा केला जातोय की पाकिस्तानमध्ये अंड्याची शेती (Egg Farming) केली जात आहे.

Advertisement
Archive

‘चेकपोस्ट मराठी’च्या अनेक वाचकांनी सदर व्हिडीओ व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

आम्ही व्हायरल व्हिडिओच्या आणि त्यातील दाव्याच्या आधारे गुगल सर्च केले असता असे लक्षात आले की हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. महत्वाचा भाग असा की अनेक ठिकाणी या व्हिडिओवर कमेंट मध्येच अनेकांनी फेक असल्याचे सांगितले आहे. काहींनी ही ‘पांढरी वांगी’ (White Brinjal)असल्याचे सांगितले आहे.

या माहितीच्या आधारे सर्च केल्यानंतर लक्षात आले की खरोखर ‘पांढरी वांगी’ असतात. त्याचे फळ जेव्हा मध्यम आकारात येते तेव्हा ते हुबेहूब अंड्याप्रमाणे दिसते. कालांतराने त्याची लांबी वाढते परंतु मधला टप्पा अगदी अंडे वाटावे असा असतो.

याच पांढऱ्या वांग्याच्या एखाद्या झाडाची दोन तीन वांगी देठापासून हळुवारपणे वेगळी केली जातात आणि त्यास कोंबडीचे अंडे चिकटवले जाते. हे प्रात्यक्षिक खालील युट्युब व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की झाडाला अंडी लागल्याचे दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ फेक आहे. ती झाडे अंड्याची नसून पांढऱ्या वांग्याची आहेत. इंटरनेटवर ‘white brinjal’ असे सर्च केल्यास त्याविषयी सर्व माहिती आणि फोटो सहज उपलब्ध होतील.

हेही वाचा: जागतिक आरोग्य संघटनेने पिशवीतल्या दुधामुळे ८७% भारतीय कॅन्सरग्रस्त होणार असल्याचा इशारा दिलाय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

  1. Deshmukh Wijay T. Deshmukh Wijay T. December 25, 2021

    वरील विडियोत वेलवर्गी वनस्पती दाखवली आहे. तुम्ही त्याला वांगे म्हणता परंतु वांगी हे झुडूप वर्गातील झाड आहे. मला वाटते ते अंड्यासारखे दिसनारे वेलीचे फळ असावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा