Press "Enter" to skip to content

जुन्या टीव्ही-रेडीओमध्ये करोडोच्या भावात जाणारी ‘रेड मर्क्युरी’? जाणून घ्या सत्य की अफवा!

‘कृष्णधवल टीव्हीतील चीप एक कोटीला’ अशा अफवा पसरल्याने जुने शटरचे टीव्ही शोधण्यासाठी जालन्यात लोकांची पळापळ चालू आहे अशी बातमी दैनिक पुण्यनगरीने प्रकाशित केली आहे. ‘जुन्या टीव्हीतील ‘रेड मर्क्युरी’ (red mercury) चिपच्या संदर्भातील हीच बातमी आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Advertisement

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक लक्ष्मीकांत सोरटे यांनी ही बातमी आमच्या निदर्शनास आणून दिली.

फेसबुक, युट्युब सारख्या माध्यमांवर हे ‘रेड मर्क्युरी’ विकणारे आणि खरेदी करणारे व्हिडीओ टाकत असता. असाच एक मागच्या आठवड्यातील व्हिडीओ.

पुराने टी.वी वाला ये रेड मर्करी हैं किसी के पास तो मुझे बता सकते हैं मैं खरीद लूंगा !8210980906

Posted by Sunny Vishwakarma on Tuesday, 15 September 2020

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’च्या माध्यमातून आम्ही हे ‘रेड मर्क्युरी’ नेमकं काय आहे? त्यासाठी लाखो करोडोचा भाव का आहे? खरंच हे जुन्या टीव्ही रेडीओमध्ये सापडतं का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

१. ‘रेड मर्क्युरी’ नेमकं काय आहे?

मर्क्युरी म्हणजे पारा. ताप तपासण्यासाठी जो थर्मामीटर वापरतात त्यामध्ये चांदीसारखा चमकणारा जो द्रव पदार्थ असतो तो म्हणजे पारा. लोखंड, तांबे, सोने यासारखाच हा सुद्धा धातूच आहे परंतु तो द्रव रुपात असतो. असाच लाल रंगाचा पारा म्हणजे ‘रेड मर्क्युरी’ असा दावा करण्यात येत आहे. असंही सांगितलं जातंय की हा अनमोल धातू खूप जुन्या टीव्ही, रेडीओ आणि अगदी शिलाई मशीनमध्ये सुद्धा सापडतो.

२. का आहे त्यास लाखो-करोडोचा भाव?

काही जणांचा दावा आहे की हा अणु बॉम्ब बनवण्यासाठी वापरला जातो तर कुणी म्हणताहेत की त्याचा वापर काळ्या जादूसाठी होतो. काही जण या ही पुढे जाऊन त्याच्या सेवनाने कोरोना बरा होत असल्याचा दावा करताहेत. त्यामुळे याची एवढ्या मोठ्या भावात बेकायदेशीररीत्या खरेदी विक्री होत असते.

३. खरोखर ‘रेड मर्क्युरी’ नावाचं काही अस्तित्वात आहे?

बीबीसी, द गार्डियन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या न्यूज एजन्सीजने पब्लिश केलेल्या रिपोर्ट्सनुसार ही एक अफवा असून केवळ पैशाची लुबाडणूक हाच यामागचा उद्देश आहे. कारण ‘रेड मर्क्युरी’ असा कुठलाही पदार्थ, धातू अस्तित्वातच नाही.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार व्हायरल दावे ज्यासाठी केले जातायत ते ‘रेड मर्क्युरी’ (red mercury) अस्तित्वात नाही परंतु ‘मर्क्युरी सल्फाईड’ असा एक घटक असतो, जो लाल रंगाचा दिसतो. परंतु तो द्रव नसून खडकासारखा असतो.

हा घटक मर्क्युरी आणि सल्फर दोन्हीचा मिळून बनलेला असतो. त्यास वितळवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यातून निघणारा पारा लाल असू शकत नाही.

४. मग जुन्या टीव्ही, रेडीओ मध्ये काय असते?

व्हायरल व्हिडीओज, फोटोजमध्ये दाखवण्यात आलेल्या ट्युब्ज दिशाभूल करणाऱ्या आहेत. आताच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणात जो ट्रांझिस्टर असतो, लोक त्यास चीप असे म्हणतात. तोच भाग जुन्या काळात ‘व्हॅक्युम ट्यूब’/ ‘थर्मीओनिक ट्यूब’ होता. याच काचेच्या सिलिंडरला हळूवारपणे खोलून त्यात नेल पेंट किंवा नवरत्न तेल ओतून पुन्हा आहे तसे ते जोडले जाते आणि व्हिडीओ करताना नव्याने ते उपकरण खोलत असल्याचे दाखवले जाते.

transistors in computers - Google Search | Transistors, Computer generation, Vacuum tube
Source: Pintrest
Do you have an old TV in your house? Don't sell for any reason! - News Next
Source: News Next

तसेच लंबगोलाकार छोट्याशा ट्यूबमध्ये सुद्धा हा ‘रेड मर्क्युरी’ असल्याचे अनेकजण दाखवतात. ती ट्यूब म्हणजे फ्युज असतो. या पोकळ काचेच्या ट्यूबमध्ये पातळ तार असते जी फ्युजचे काम करते. यातही नवरत्न तेल वगैरे भरून मग व्हिडीओ केले जातात.

fuse in TV sets checkpost marathi
Red mercury fact check checkpost marathi

५. लसूण आणि सोन्याने केलेली चाचणी

व्हायरल व्हिडीओजमध्ये खरा ‘रेड मर्क्युरी’ ओळखण्यासाठी काही टेक्निक सांगण्यात आल्या आहेत. म्हणजे त्या द्रवाजवळ लसूण नेल्यास तो दूर जातो, सोने नेल्यास सोन्याकडे खेचला जातो असं सांगण्यात आलं आहे.

तो अस्सल ‘रेड मर्क्युरी’ (red mercury) कुणाला खरेदी करायचा असल्यास व्हिडीओ सोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. ही सर्व हातचलाखी आणि व्हिडीओ एडिटिंग टेक्निकची कमाल असल्याचे अनेक युट्युबर्सने उलगडून दाखवले आहे. जो पदार्थ अस्तित्वातच नाही त्याची काय चाचणी घेणार?

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की ‘रेड मर्क्युरी’ असा कुठलाही पदार्थ किंवा धातू अस्तित्वातच नाही. दुतोंडी मांडूळ, कासव यांची जशी काला जादूच्या नावाखाली तस्करी होते तसाच हा काहीसा प्रकार आहे. या दाव्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही ना ही कसले पुरावे.

‘रेड मर्क्युरी’ विकण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी बोलावून पैसे लुटणे किंवा विकत घेण्याच्या बहाण्याने बोलावून फेक पोलिसांच्या रेड मध्ये पकडून त्याच व्यक्तीकडून लाखो रुपयांची लाच उकळणे अशा प्रकारच्या अनेक घटना घडताहेत .

देशात बंगळूरु, कोइम्बतुर यासारख्या भागात आणि जगातही विविध शहरांत या ‘रेड मर्क्युरी’च्या नावे लोकांची फसवणूक करणाऱ्या विविध गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: व्हॉट्सऍपने ISIS तुमच्या ‘डीपी’चा गैरवापर करत असल्याचा इशारा दिलाय?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा