Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांच्या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या का?

सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जातोय. शीख लोकांच्या निषेध मोर्चाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ ‘पंजाब बनेगा खालिस्तान’ आणि ‘पाकिस्तान जिंदाबाद’ यांसारख्या घोषणा (pro pakistan slogans in farmers protest) दिल्या जाताहेत. दावा करण्यात येतोय की हा व्हिडीओ सध्याच्या दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यानचा आहे.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट 

फेसबुक आणि व्हाट्सअपवर देखील अनेक युजर्सकडून हा व्हिडीओ शेतकरी आंदोलनाच्या संदर्भाने शेअर केला जातोय.

Source: Facebook
Source: Whatsapp

पडताळणी:

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओच्या किफ्रेम्स आम्ही यांडेक्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. हा व्हिडीओ शोएब मलिक या युट्यूब चॅनेलवरून दि. २३ जानेवारी २०१९ रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे दिसून आले.

व्हिडीओचं डिस्क्रिप्शन उपलब्ध नसल्याने व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती त्या ठिकाणी मिळू शकली नाही. मात्र व्हिडीओ अपलोड करणारी व्यक्ती पाकिस्तानी असल्याचं मात्र ट्विटर प्रोफाईलवरून समजलं.

त्यानंतर आम्ही काही किवर्डसह युट्युबवर हा व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ‘द काश्मीर पल्स’ या युट्युब चॅनेलवर देखील १९ ऑक्टोबर २०१५ रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शननुसार हा व्हिडीओ उत्तर काश्मीरमधील बारामुला येथील आहे.

जम्मू-काश्मीरच्या बारामुला येथे ‘गुरु-ग्रंथ साहिब’ या शीख धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या ग्रंथाच्या अपमानाचा निषेध म्हणून तेथील शीख धर्मियांकडून खलिस्तान आणि पाकिस्तान समर्थक (pro pakistan slogans in farmers protest) घोषणाबाजी करण्यात आली होती.

‘ग्रेटर काश्मीर’च्या वेबसाईटवर या घटनेची सविस्तर माहिती देणारी बातमी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. बातमीनुसार पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील कोटकपुरापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या बरगारी या गावात पवित्र धर्मग्रंथाचा अपमान झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शीख धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या ग्रंथाची १०० पाने गुरुद्वाऱ्याजवळील रस्त्यावर विखुरलेलया स्वरूपात आढळली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओतील दावे चुकीचे आहेत. ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देणाऱ्या व्हिडिओचा शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.

व्हायरल व्हिडीओ सध्याचा नसून २०१५ सालचा आहे. काश्मीरमध्ये शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाच्या अपमानाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चातील व्हिडीओ शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याच्या हेतूने शेअर करण्यात येतोय.

हे ही वाचा- शेतकरी आंदोलनाला ‘देशद्रोही’ ठरवण्यासाठी भाजप नेत्याने शेअर केला ७ वर्ष जुना फोटो!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा