Press "Enter" to skip to content

मुकेश अंबानींनी नातू झाल्याच्या आनंदात कोरोना नियमांचे केले उल्लंघन? मुख्यमंत्रीसुद्धा सामील?

मुकेश अंबांनी यांना नातू झाला. त्याच्या आनंदात आयोजित केलेल्या समारंभात (mukesh ambani grandson birth party) बॉलीवूड सेलिब्रिटी आणि नेते मंडळी सुद्धा सामील झाले होते. सर्वांनीच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांना हरताळ फासला. असे दावे करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल होतोय.

Advertisement

“मुकेश अंबानी दादा बने वो खुशी में सभी नियमों का उल्लंघन करते हुए सब बडे बडे लोग। ये सभी कायदे-कानून तो मिडल क्लास की फैमिली के लिये है।” अशा कॅप्शनसह व्हिडिओ पोस्ट केला गेलाय.

मुकेश अंबानी दादा बने वो खुशी में सभी नियमों का उल्लंघन करते हुए सब बडे बडे लोग। ये सभी कायदे-कानून तो मिडल क्लास की फैमिली के लिये है।

Posted by Nirmal Saharan on Monday, 21 December 2020

याच कॅप्शनसह ‘हेमंत कुमार बाराथवाल’ नामक फेसबुक युजरनेसुद्धा हा व्हिडीओ शेअर केलाय.

‘मुकेश अंबानी आपणास नातू झाला त्याबद्दल अभिनंदन, पण या पार्टीत ना फेस मास्क आहेत ना सोशल डीस्टन्सच. कोरोना व्हायरस गेलाय का?’ अशा शब्दांत फेसबुकवर सैद युसुफ हुसेन यांनीही पोस्ट शेअर केलीय.

Congratulations Mr. Mukesh Ambani for your loving Pota..But in this party there is no face mask n social distancing among people..Is Corona over..?

Posted by Syed Yusuf Husain on Monday, 21 December 2020

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स आम्ही जेव्हा रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या तेव्हा युट्युबवरील एका व्हिडीओसोबत यातील अनेक फोटोज मिळते जुळते आढळले.

२ सप्टेंबर २०१९रोजी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या युट्युब चॅनलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यातील माहिती नुसार गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अंबानींनी आपल्या ‘ऍंटेलिया’ इमारतीमध्ये आयोजित केलेल्या समारंभास विविध सेलिब्रिटीजने हजेरी लावली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अभिनेता अमीर खान, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांसारखे अनेक सिने कलाकार होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये मुकेश अंबानींच्या नातवाच्या जन्मोत्सव पार्टी संदर्भांत (mukesh ambani grandson birth party) व्हायरल दावे निखालस खोटे असल्याचे निष्पन्न झाले. व्हायरल व्हिडीओ सप्टेंबर २०१९ सालचा आहे. अंबानींच्या नातवाचा जन्म १० डिसेंबर २०२० साली झाला. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काहीएक संबंध नाही.

दोन्ही घटनांत एक वर्षाहून अधिक काळाचे अंतर आहे. त्यावेळी कोरोना विषाणूचा भारतात प्रभाव नव्हता, त्यामुळे त्या समारंभात सुद्धा मास्क व सोशल डीस्टन्सिंगचे नियम का नाहीत पाळले हे विचारणे सुद्धा अतार्किक आहे.

हेही वाचा: भाजप सरकारने सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाचं नाव बदलून ‘अदानी विमानतळ’ केलंय?

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा