सोशल मीडियावर एका रॅलीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. गेल्या ७० वर्षांमध्ये प्रथमच पाकिस्तान मधील कराचीत पार पडलेल्या रॅलीमध्ये भारतीय तिरंगा झेंडा फडकविण्यात आल्याचा (indian flag in karachi) दावा अनेकांकडून करण्यात येतोय.
ट्विटरवर ज्योती द्विवेदी या युजरकडून शेअर करण्यात आलेला हा फोटो बातमी लिहीपर्यंत ६१२ वेळा रिट्विट करण्यात आला होता.
फेसबुकवर देखील याच कॉपी पेस्ट दाव्यासह हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.
पडताळणी:
पाकिस्तानातल्या कराचीत जर भारतीय तिरंगा फडकविण्यात आला असता तर ती निश्चितच एक मोठी बातमी झाली असती, परंतु आम्हाला भारतीय किंवा पाकिस्तानातील कुठल्याही माध्यमांमध्ये अशी कुठलीही बातमी सापडली नाही.
व्हायरल फोटो नेमका कुठला हे तपासण्यासाठी आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला त्यावेळी आम्हाला ‘युरेशियन टाईम्स’ची एक बातमी मिळाली. बातमीनुसार व्हायरल फोटो इम्रान खान विरोधातील निषेध रॅलीचा आहे. या रॅलीत कथितरित्या भारतीय तिरंगा दिसून आल्याने (indian flag in karachi) भारतात कराची ट्रेंड करत असल्याचं देखील बातमीत म्हटलंय.
‘युरेशियन टाईम्स’ने यासंदर्भात बातमीत तज्ज्ञांची प्रतिक्रिया देखील प्रसिद्ध केलीये. तज्ज्ञांच्या मते फोटोत दिसणारा तिरंग्यासारखा झेंडा ‘पाकिस्तान आवामी तेहरीक’ या राजकीय पक्षाचा असण्याची शक्यता आहे. ‘पाकिस्तान आवामी तेहरीक’चा झेंडा देखील तीन रंगांचाच आहे. कुणीतरी या झेंड्याशी छेडछाड केली असण्याची शक्यता आहे.
हाच धागा पकडून मिळालेल्या माहितीची खात्री करून घेण्यासाठी आम्ही ‘पाकिस्तान आवामी तेहरीक’च्या वेबसाईट आणि सोशल मीडिया हॅण्डल्सना देखील भेट दिली. त्यावेळी या पक्षाचा झेंडा देखील तिरंगाच असल्याचे लक्षात दिसून आले. या झेंड्यामध्ये भारतीय तिरंग्याप्रमाणे अशोकचक्र मात्र नाही.

त्यानंतर आम्ही पाकिस्तानातील प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीगच्या ट्विटर हॅण्डल्सना भेट दिली. या ट्विटर हॅण्डल्सवरून कराची रॅलीचे फोटोज अपलोड करण्यात आलेले आहेत. तसेच रॅलीच्या ड्रोन शॉट्सचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे. पण त्यात कुठेही आम्हाला तिरंगा आढळून आला नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की गेल्या ७० वर्षात प्रथमच पाकिस्तानमध्ये भारतीय तिरंगा फडकावला गेल्याच्या सोशल मीडियावरील दाव्यांना कसलाही आधार नाही.
व्हायरल फोटो पाकिस्तानातील विरोधी पक्षांच्या सरकारविरोधातील रॅलीतील असून भारतीय तिरंग्यासारखा दिसणारा झेंडा पाकिस्तानातील विरोधी पक्ष ‘पाकिस्तान आवामी तेहरीक’चा असण्याची शक्यता आहे. या झेंड्याशी छेडछाड करून तो भारतीय तिरंगा असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जातोय.
हेहीवाचा- श्रीनगरमधील लाल चौकात फडकला तिरंगा म्हणत भाजप नेते शेअर करताहेत एडिटेड फोटो!
[…] […]
[…] […]