Press "Enter" to skip to content

राहुल गांधींची ‘बनावट समाजसेवा’ उघडकीस आणणारे व्हिडीओज झाले लीक? वाचा सत्य!

कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या संदर्भातले २ व्हिडीओज सोशल मीडियात व्हायरल होताहेत. राहुल गांधी यांनी एका सामान्य नागरिकास अपघातानंतर स्वतःच्या गाडीत घेऊन जात रुग्णालयात दाखल केल्याचे तो इसम स्वतः व्हिडीओत सांगतोय. सोशल मीडियात दावा केला जातोय की ती फिल्म नंतर रिलीज झाली, खरी स्क्रिप्ट तर गाडीत तयार झाली होती.

Advertisement

‘देखिए मगर प्यार से…🙏🏻Part-1 और Part-2 , 2 मीनीट की क्या नौटंकी Pictures बनायी Hai……मान गए और फिल्म रिलीज़ भी कर दी गई (बाद में) ऐसा समाज सेवक धरती पर पहली बार पैदा हुआ है, पप्पू आख़िर पप्पू ही रहेगा’ अशा कॅप्शन सह दोन व्हिडीओज व्हायरल होतायेत.

Rahul Gandhi fake social worker claim on FB
Source: Facebook

पहिल्या व्हिडीओमधील व्यक्ती राहुल गांधी यांच्या मदतीविषयी आभार मानताना दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडीओत गाडीमध्ये तोच व्यक्ती राहुल गांधी यांच्याकडून दुसऱ्यांदा डोके पुसून घेत हे मला मिडीयाला दाखवता येईल असे सांगत असल्याचं ऐकायला मिळतंय. म्हणजेच ही समाजसेवा खरी नसून स्क्रिप्ट बनवून केलेली आहे असा आरोप या पोस्ट्समधून केला जातोय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक वाघेश साळुंखे यांनी व्हायरल पोस्ट निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित बघितला असता त्यामधील व्यक्ती हुमायून बागेत (Humayun Bagh)अपघात झाल्यानंतर राहुल गांधी यांनी मदतीचा हात कसा दिला हे सांगत आहे. याच कीवर्ड्सचा आधार घेत गुगल सर्च केले असता २०१९ साली म्हणजेच २ वर्षांपूर्वी विविध राष्ट्रीय माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या आम्हाला मिळाल्या.

दिल्लीतील हुमायून बाग परिसरात राजेंद्र व्यास (Rajendra Vyas) या राजस्थान येथील पत्रकाराचा छोटासा अपघात झाला. त्याचवेळी तेथून राहुल गांधी यांचा ताफा चालला होता. हे पाहून जखमी व्यास यांना राहुल गांधींनी आपल्या गाडीत बसवून घेतले आणि पुढील उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन गेले. असा मजकूर सर्व बातम्यांचा आहे.

विशेष म्हणजे बहुतांश बातम्यांमध्ये राजेंद्र व्यास स्वतः घटनेचे वर्णन करत असणारा व्हिडीओ नसून पहिला व्हिडीओ ज्यामध्ये राहुल गांधी त्यांच्या डोक्याची जखम पुसून देतानाचा आहे. अनेक पत्रकारांनी, कॉंग्रेस नेत्यांनीही त्यावेळी तोच व्हिडीओ ट्विट केला होता. म्हणजेच त्यात ‘एक्सक्लुजीव्ह’ किंवा ‘लीक’ झालेला व्हिडीओ म्हणण्यासारखे काहीच नाही.

अगदी ‘एनडीटीव्ही‘ने सुद्धा बातमीत व्यास यांनी राहुल गांधी यांना दुसऱ्यांदा डोक्याची जखम पुसण्यास सांगितल्याच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. परंतु यात कुठला बनाव नसून राहुल गांधींकडून सेवा करून घेतल्याचा पुरावा आपल्या मीडियातील मित्रमंडळींना दाखवायचा हेतू व्यक्त करत ते हसताना दिसतायेत. तो व्हिडीओ राहुल गांधी यांच्या सहाय्यकानेच शूट केला होता, जर त्यातील बाबी आक्षेपार्ह किंवा लपवण्यायोग्य असल्या असत्या तर तो जागीच डिलीटही झाला असता हा साधा तर्क कुणीही लावू शकतो.

राहुल यांनी त्या आधीसुद्धा अशाच एका पत्रकाराला मदत केली होती. त्याचा व्हिडीओ ANI या वृत्तसंस्थेने ट्विट केला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की सदर घटना आताची नसून २ वर्षांपूर्वीची आहे. तसेच यातील दोन्ही व्हिडीओज त्यावेळीच समोर आले होते किंबहुना सर्वच माध्यमांत ते प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे काहीतरी खळबळजनक हाती लागून राहुल गांधी यांच्या ‘बनावट’ समाजसेवेची पोलखोल केल्याचा आव आणणाऱ्या पोस्ट्स चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.

हेही वाचा: ‘भाजप’ने भर न्यायालयात मागितली गांधी परिवाराची माफी? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘च्चेयाकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा