Press "Enter" to skip to content

मुंबईतील वीज खंडीत होण्यामागे ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’चा पूर्वनियोजित कट होता?

मुंबई शहरात वीज खंडीत होण्यामागे ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’चा (adani electricity) पूर्वनियोजित कट असल्याचे दावे करणारी एक नोटीस व्हायरल होतेय.

मुंबई शहरात आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडीत झाला. सर्वच जनजीवन विस्कळीत झाले होते. विरोधी पक्षातून उर्जामंत्र्यांवर टीकेची झोड उठतेय तर काही नागरिक हा ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’चा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा करत एक नोटीस सोशल मीडियातून फिरवत आहेत.

११ तारखेलाच नोटीस काढून संबंधित भागात वीज पुरवठा खंडीत असेल असे सांगण्यात आले होते. डेक्कन हेराल्डसाठी स्तंभलेखन करणाऱ्या शरेल कुक यांनीही या नोटीसचा फोटो शेअर करत थेट अदानी इलेक्ट्रिसिटीला (adani electricity) प्रश्न विचारलाय.

Advertisement

अर्काइव्ह लिंक

व्हॉट्सऍपवर देखील अशाच पद्धतीने दुसऱ्या भागाचे नाव असणारी नोटीस शेअर करून लोक एकंदर पॉवर कटवर लोक शंका उपस्थित करताहेत. हा सर्व प्रकार ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दत्तू गवाणकर यांनी निदर्शनास आणून देत पडताळणी करण्याची विनंती केलीय.

पडताळणी:

आज दिवसभराच्या इलेक्ट्रोनिक मीडियातून येणाऱ्या बातम्या आणि शासन प्रशासनातील पदाधिकाऱ्यांची वक्तव्ये ऐकल्यास लक्षात येईल की हे पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे घडलेलं आहे.

तरीही आम्ही उलटतपासणी करण्यासाठी या व्हायरल नोटीसबद्दल ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’चे काही अधिकृत स्पष्टीकरण आहे का हे तपासण्यासाठी त्यांची वेबसाईट चेक केली परंतु तिथे काही सापडलं नाही. परंतु अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मात्र व्हायरल नोटीस पोस्ट करून प्रश्नांचा भडीमार करणाऱ्या प्रत्येकास ट्विटरवरून उत्तर देण्यात आले आहे.

‘ही नोटीस ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी वापरली जात असून याचा ग्रीड फेल्युअरशी काहीएक संबंध नाही. आमच्या मेंटेनन्ससाठी नियोजित असणाऱ्या ८ हजार सब स्टेशन पैकी या एकाच्या वीज पुरवठा खंडीत करण्याची ही नोटीस आहे.’ असे स्पष्टीकरण अदानी इलेक्ट्रिसिटीकडून देण्यात आले आहे.

तरीही खात्री करून घेण्यासाठी आम्ही सर्च केले असता ‘बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट’ म्हणजेच BEST च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर झालेल्या ट्विटवरून ‘टाटा इलेक्ट्रिसिटी’मुळे ही अडचण उभी राहिली असल्याचे नमूद केले आहे.

टाटा पॉवरकडून सुद्धा यास दुजोरा मिळालाय. त्यात त्यांनी नेमके कोणकोणत्या सबस्टेशनवर ट्रीपींग झाले होते याविषयीसुद्धा माहिती दिली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’च्या व्हायरल नोटीसचा आणि मुंबईत झालेल्या ग्रीड फेल्युअरमुळे वीज पुरवठ्यातील खंडनाचा काहीएक संबंध नाही. व्हायरल दावे चुकीचे असून सबस्टेशनमधील नियमित मेंटेनन्सस करिता त्यांनी वीजपुरवठा खंडीत होईल अशी नोटीस दिलेली आहे.

हेही वाचा: अटल बोगद्याचा म्हणून भाजप नेते फिरवताहेत अमेरिकेतील बोगद्याचा फोटो!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा