Press "Enter" to skip to content

न्याय मागायला गेलेल्या हिंदू मुलीला पाकिस्तानमध्ये वकिलांनीच लाथा बुक्क्यांनी मारले? वाचा सत्य!

पाकिस्तानामध्ये लग्नासाठी बहिणीचे अपहरण केल्याची तक्रार देत न्यायासाठी दाद मागायला हिंदू युवती कोर्टात गेली. परंतु तिला आत जाण्यापासून रोखण्यासाठी वकिलांनी कोर्टाबाहेरच लाथा बुक्क्यांनी निर्दयीपणे मारहाण केल्याच्या (Hindu girl beaten by lawyers) दाव्यासह सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल होतोय.

Advertisement

‘यह पाकिस्तान का वीडियो है और हिंदू धर्म की लड़की है इसकी बड़ी बहन को उठाकर जबरदस्ती निकाह कर लिया और छोटी बहन कोर्ट पहुंच गई,,,लेकिन कोर्ट में उसको घुसने ही नहीं दे रहे हैं,,,, मंजर देखिए कैसा? वहाँ कोर्ट में भी उसको नहीं जाने दे रहे हैं,,, धक्के देकर, लात मारकर भगा रहे हैं,
हिन्दुओं के लिए वहां कोई लोकतंत्र नहीं
अब समझे CAA/NRC क्यों जरूरी है?
फिर भी यहां का हिंदू भाईचारा निभाना चाहता है’

या अशा कॅप्शनसह युवतीला वकिलांकडून मारहाण होत असतानाचा १.१२ मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

अर्काईव्ह

RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सत्य सनातन धर्म, आर्यावर्त के रक्षक, नरेंद्र मोदी फॅनपेज ग्रुप, इंडिया सपोर्ट CAA & NRC या अशा नावांच्या फेसबुक ग्रुप्सवर देखील सदर व्हिडीओ त्याच दाव्यांसह शेअर केला गेलाय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अंबादास जरारे यांनी व्हॉट्सऍपवरूनही अशाच प्रकारचे दावे पसरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

  • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की-फ्रेम्स यांडेक्स वर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या असता पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन‘ची ३० ऑक्टोबर २०१९ रोजीची बातमी बघायला मिळाली.
  • बातमीनुसार पाकिस्तानातील शकरगढमधील नरोवल कोर्टाच्या बाहेर हा प्रकार घडलाय. अमरीत असे पीडित मुलीचे नाव असून एका केस संदर्भात न्यायालयात दाद मागितली असता वकिलांनी तिला खेचून बाहेर काढले आणि मारहाण केली, असा पीडितेचा दावा आहे.
Pakistan girl thrashed by lawyers the express tribune news_ Check post marathi fact
Source: The express Tribune
  • हाच धागा पकडत गुगल सर्च केले असता ‘डॉन‘ या नामांकित पाकिस्तानी वृत्तपत्राच्या वेबसाईटवर ३१ ऑक्टोबर २०१९ म्हणजे तब्बल २ वर्षांपूर्वी प्रसिद्ध बातमी मिळाली.
  • बातमीनुसार अमरीत शहजादी आणि तिचा चुलतभाऊ अब्दुल कय्युम जमीनीच्या वादासंदर्भात न्यायालयात गेले होते. मुहम्मद अतिफ खान या वकिलाच्या चेंबरमध्ये त्यांची चर्चा बाचाबाचीत बदलली. तेथील वकिलांनी या दोघांना चेंबरमधून बाहेर काढत अक्षरशः लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
  • सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत तेथील मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्यापर्यंत जाऊन पोहचला तेव्हा त्यांनी कारवाईचे आदेश दिले. तीन वकील आणि चार इतर इसमांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार व्हायरल व्हिडीओ २ वर्षे जुना असून हिंदू मुलीला वकिलांकडून मारहाण करण्यात आल्याचा (Hindu girl beaten by lawyers) दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले.

व्हिडीओतील युवती हिंदू नसून मुस्लिमच आहे. अमरीत शहजादी असे तिचे नाव आहे. ती बहिणीच्या अपहरणाची नव्हे तर जमिनी संबंधी वादाची तक्रार घेऊन गेली होती.

हेही वाचा: मुस्लीम राष्ट्राच्या निर्मितीसाठी केरळातील मुस्लीम मुलींना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जातेय?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा