Press "Enter" to skip to content

काँग्रेस नेत्यांच्या मीटिंगमधील बॅनरवर ‘चोर ग्रुप मिटिंग’ लिहिण्यात आलं होतं?

सोशल मीडियावर काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतला फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंह आदी काँग्रेस नेते दिसताहेत. त्यांच्या मागे असलेल्या बॅनरवर ‘Chor Group Meeting’ असं लिहिलेलं दिसतंय.

Advertisement

या फोटोवरून सोशल मीडियात काँग्रेस पक्षाची थट्टा उडवली जातेय. काँग्रेस पक्षाकडून स्वतःच काँग्रेस हा चोरांचा पक्ष असल्याची कबुली दिली गेली असल्याचा दावा केला जातोय.

अर्काइव्ह

काही युजर्सकडून दावा केला जातोय की ‘core group’ ऐवजी ‘Chor Group’ लिहून पक्षाने अजाणतेपणे का होईना पण सत्याचा स्वीकार केला आहे.

Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल फोटो नेमका कधीचा आणि कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘झी न्यूज हिंदी’च्या वेबसाईटवर प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. “कांगेस कार्यसमिति की बैठक आज, क्या पार्टी को मिलेगा नया अध्यक्ष?” अशा हेडलाईनसह १० ऑगस्ट २०१९ रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली होती.

Source: Zee News

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पक्षाला नवीन अध्यक्ष मिळू शकण्याचा अंदाज बातमीमध्ये वर्तविण्यात आला होता. पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, सुशील कुमार शिंदे यांची नावे आघाडीवर असल्याचे बातमीत सांगण्यात आले होते.

‘झी न्यूज’च्या बातमीतील फोटोमधील बॅनरवर कुठेही ‘Chor Group Meeting’ असं लिहिलेलं बघायला मिळत नाही. बॅनरवर फक्त देवनागरीमध्ये ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ आणि त्याखालोखाल इंग्रजीमध्ये ‘Indian National Congress’ एवढंच बघायला मिळतंय. म्हणजेच मूळ फोटोत कुठेच ‘Chor Group Meeting’ असं लिहिलेलं नाही. व्हायरल फोटोमध्ये एडिटिंगच्या साहाय्याने ते घुसडण्यात आलंय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काँग्रेस नेत्यांच्या मीटिंगमधील बॅनरवर ‘चोर ग्रुप मिटिंग’ असं लिहिण्यात आलं नव्हतं. सोशल मीडियावरील व्हायरल फोटो एडिटेड आहे.

हेही वाचा- इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव ‘फिरोज गांधी’ नव्हे ‘फिरोज खान’ होते? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा