सोशल मीडियावर एका व्यक्तीला मारहाण करण्यात येत असलेला व्हिडिओ मोठया प्रमाणात व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की संबंधित व्यक्ती भाजप कार्यकर्ता उमेशसिंह असून ही व्यक्ती शेतकरी आंदोलनात घुसून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत होती. (BJP worker beaten up for sloganeering ‘Pakistan Zindabad’) ‘भारत समाचार’ या न्यूज चॅनेलचा हा व्हिडीओ आहे.
शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या या भाजप कार्यकर्त्याला आंदोलकांनी जोरदार चोप दिला (BJP worker beaten up for sloganeering ‘Pakistan Zindabad’) आणि पोलिसांच्या स्वाधीन केल्याचं सांगितलं जातंय.
ट्विटरवर देखील अशाच प्रकारचा दावा केला जातोय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही व्हिडीओ वयवस्थित बघितला आणि ऐकला. आम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा ऐकायला मिळाल्या नाहीत. व्हिडीओमध्ये ‘भारत समाचार’चा लोगो दिसत असल्याने आम्ही किवर्ड सर्चच्या साहाय्याने मूळ व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला ‘भारत समाचार’च्या ट्विटर हँडलवरून दि. १४ डिसेंबर रोजी करण्यात आलेलं ट्विट मिळालं. या ट्विटनुसार हा व्हिडीओ दिल्ली-उत्तर प्रदेश बॉर्डरवरील आहे. व्हिडिओत ज्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे, त्या व्यक्तीचं नाव अरुण आहे. संबंधित व्यक्तीला माध्यमांशी हुज्जत घालण्याच्या कारणावरून आंदोलकांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेसंदर्भात गाझियाबाद पोलिसांनी ‘बूम’ला दिलेल्या माहितीनुसार मारहाण करण्यात आलेली व्यक्ती अरुण कुमार असून तो उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी असून त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही.
‘एबीपी गंगा’ने देखील या घटनेची बातमी दिली आहे. बातमीनुसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी हुज्जत घालत असल्याच्या करणावरून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संबंधित व्यक्तीला पकडले आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांकडून मारहाण करण्यात येत असलेली व्यक्ती ‘उमेशसिंह’ नसून ‘अरुण कुमार’ आहे.
व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचा भाजपशी किंवा इतर कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत. शेतकऱ्यांनी संबंधित व्यक्तीला आंदोलनामध्ये घुसून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यावरून नाही तर माध्यमांच्या प्रतिनिधींशी हुज्जत घालण्याच्या कारणावरून मारहाण केली होती.
हे ही वाचा- शेतकऱ्यांच्या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या का?
[…] हे ही वाचा- भाजप कार्यकर्त्याने शेतकरी आंदोलनात … […]