Press "Enter" to skip to content

वारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला नाही, ‘तो’ व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा !

भाजपचे खासदार अर्जुन सिंग यांनी ट्वीटरवर वारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला असल्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अर्जुन सिंग लिहितात, “बघा, वारीस पठाण पोलिसांना खुलेआम धमकावत आहेत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे संजय राऊत हे योगी आदित्यनाथांना कायदा आणि प्रशासन कसं हाताळायचं, याचे धडे देताहेत. आधी मुंबई सांभाळा”  

Advertisement

हाच व्हिडीओ लॉकडाऊनच्या काळात मस्जिद सुरु ठेवण्यासाठी वारीस पठाण पोलिसांना धमकावत असल्याच्या आशयासह इतरही अनेक फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय.

कुणी म्हणतंय ‘जर अशीच परिस्थिती राहिली तर ३ मी ला लॉकडाऊन संपण्याची आशा सोडून द्या. सरकारी कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे’ तर कुणी ‘महाराष्ट्राची काय अवस्था झालीय’ असं म्हणत आहे.

पडताळणी:

व्हिडीओवर सहज नजर टाकली असता हा व्हिडीओ भायखळा येथील असून ‘मुंबई लाइव्ह’ या चॅनेलचा असल्याचं लक्षात येतं. व्हिडीओच्या दोन्ही कोपऱ्यात तशी माहिती उपलब्ध आहे.

या माहितीच्या आधारे आम्ही युट्युबवर ‘वारीस पठाण मुंबई लाइव्ह’ या कीवर्डसह व्हिडीओ शोधला. पहिल्याच सर्च रिझल्टमध्ये आम्हाला ‘मुंबई लाइव्ह’ या युट्युब चॅनेलवर संबंधित व्हिडीओ सापडला. १ मिनिट १३ सेकंदाचा हा व्हिडीओ १८ नोव्हेंबर २०१६ रोजी ‘मुंबई लाइव्ह’ चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय.

या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी आणि वारिस पठाण यांच्यात मशिदीतील लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वाद होत असल्याचे लक्षात येते आहे. व्हिडीओमध्ये वारीस पठाण म्हणतात, “देशमुख साहेब, ही चांगली लोकं आहेत. ४० वर्षांपासून इथं राहताहेत. यांना परेशान करू नका. मस्जिद आणि लाऊडस्पीकर बंद करण्याचा प्रयत्न करू नका. मस्जिद जशी सुरु आहे, तशी सुरु राहू द्या. हॉस्पिटल जसे सुरु आहेत, तसे राहू द्या”

वस्तुस्थिती:

वारीस पठाण आणि पोलिसांमध्ये मशिदीतील लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वाद होताना या व्हिडीओमध्ये स्पष्टच दिसतंय, परंतु हा व्हिडीओ ३ वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजेच कोरोना काळात लागू असलेला लॉकडाउन तोडून वारीस पठाण हॉस्पिटलप्रमाणेच मशीद सुद्धा सुरु राहू द्या, म्हणूत पोलिसांना धमकावत आहेत, असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही.

यावरून हे स्पष्टच होतं की १ मिनिट १३ सेकंदाच्या व्हिडीओमधील ५६ सेकंदाचा भाग कापून तो लॉकडाऊनच्या काळातील असल्याचे सोशल मिडीयावरील दावे फेक आहेत. संबंधित व्हिडीओचा आणि लॉकडाऊनचा काहीएक संबंध नाही. म्हणूनच हा व्हिडीओ आम्ही ‘चेकपोस्ट’वरच अडवत आहोत.

हे ही वाचा- ‘कॉंग्रेसचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन पंतप्रधान निधी साठी देणार’-‘सरकारनामा’ची बातमी दिशाभूल करणारी

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा