Press "Enter" to skip to content

विशालकाय चंद्र पृथ्वीवर आदळण्याचा भास निर्माण करणारा तो व्हायरल व्हिडीओ फेक!

‘रशिया ते कॅनडा च्या मध्ये उत्तर ध्रुवावर आर्क्टिक महासागरा जवळ पृथ्वी ची परिक्रमा करताना चंद्र पृथ्वीच्या कक्षेच्या इतका जवळ येतो व असा भास होतो की तो पृथ्वी वर आदळणार की काय!’ अशा दाव्यासह एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement


हि परिक्रमा तो फक्त 30 सेकंदात पूर्ण करतो. 5 सेकंद तो सुर्याला झाकून टाकतो व लगेचच अदृश्य होतो. निसर्गाच्या अनेक चमत्कारा पैकी एक विलोभनीय दृश्य’
‘ अशा कॅप्शनसह साधारण ३६ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अर्काइव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी, प्रशांत गावडे आणि जितेश वैष्णव यांनी फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर देखील हे दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

 • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची पडताळणी करताना ‘ऍडव्हान्स्ड की वर्ड्स’च्या आधारे गुगल सर्च केले असता हेच दावे इंग्रजीतूनही अनेक दिवसांपासून व्हायरल होत असल्याचे लक्षात आले.
 • व्हायरल दाव्यात सर्वात हास्यास्पद बाब म्हणजे ‘रशिया ते कॅनडा च्या मध्ये उत्तर ध्रुवावर आर्क्टिक महासागरा जवळ’ हे दृश्य पहायला मिळाल्याचा दावा.
 • कारण रशिया ते कॅनडामध्ये तब्बल ६,४४० किलोमीटर एवढं अंतर आहे. आपल्या काश्मीर ते कन्याकुमारीचे अंतर ३६७६ किलो मीटर एवढं आहे. म्हणजेच या अंतराच्या दुप्पट अंतराच्या भवतालातून आर्क्टिक महासागराजवळ आलेल्या चंद्राचा व्हिडिओ कुठून आणि कसा काढला असेल याचा विचारच अतार्किक आहे.
 • इंग्रजी दाव्यांचे विविध फॅक्टचेक पोर्टल्सने खंडण करत मूळ व्हिडिओ “Aleksey” नावाच्या एका व्यक्तीने टिकटॉकवर अपलोड केला होता असे सांगितले आहे.
 • होक्स आय या ट्विटर हँडलने सदर व्हिडीओ कम्प्युटरवर तयार केलेली VFX कलाकृती असल्याचे ते तयार करणाऱ्या कलाकाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच ट्विटवर त्यांनी रिप्लाय देत Alekseyच्या टिकटॉक व्हिडीओची लिंक शेअर केलीय.
 • याच Aleksey चे इंस्टाग्राम प्रोफाईल जर आपण पाहिले तर त्यावर त्याने CG Artist म्हणजेच ‘कम्प्युटर ग्राफिक आर्टिस्ट’ असल्याचे लिहिले आहे. यावर आपणास त्याने बनवलेले विविध व्हिडीओज देखील पहायला मिळतील.
Source: Instagram

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये असे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओ कम्प्युटरवर तयार केलेला आहे. रशिया ते कॅनडाच्या मध्ये उत्तर ध्रुवावर आर्क्टिक महासागराजवळ पृथ्वीची परिक्रमा करताना चंद्र पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ आल्याचे दावे फेक आहेत.

हेही वाचा: ५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा