सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा एका कारची काच साफ करत असताना बघायला मिळतोय. काच साफ करत असलेल्या मुलाच्या हातात स्मार्ट वॉच बघायला मिळतेय. थोड्या वेळाने मुलगा गाडीची काच साफ करून तिथून पळून जातो.
मुलगा पळून गेल्यानंतर कार चालकाकडून दावा करण्यात येतोय की त्या मुलाने आपल्या हातातील घडीच्या मदतीने कारवरील फास्टॅग कोड स्कॅन करून फास्टॅगमधील जमा पैसे काढले आहेत. हा एक नवीन घोटाळा (fastag scanner watch scam) सुरु झालाय. यापासून सावध रहा.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक युजर्सकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जायला लागल्यानंतर फास्टॅगच्याच अकाऊंटवरून ट्विटच्या माध्यमातून व्हायरल व्हिडिओसोबत केले जात असलेले दावे चुकीचे असल्याचे स्प्ष्ट करण्यात आले आहे.
फास्टॅगच्या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की फास्टॅगवर केवळ NPCI द्वारे नोंदणीकृत व्यापारीच (टोल आणि पार्किंग प्लाझा ऑपरेटर) व्यवहार करू शकतात. कोणत्याची अनधिकृत उपकरणाच्या माध्यमातून फास्टॅगवर कुठलेही आर्थिक व्यवहार केले जाऊ शकत नाही. त्यामुळे फास्टॅग पूर्णतः सुरक्षित आहे.
पेटीएमच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देखील यासंबंधी स्पष्टीकरण देण्यात आले असून व्हायरल व्हिडीओ फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून पेटीएम फास्टॅगसंबंधी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे ट्विटमध्ये म्हंटले आहे. पेटीएम फास्टॅग पूर्णतः सुरक्षित असल्याची माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देखील व्हिडीओसोबत केले जात असलेले दावे चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्यात वाहून जाणाऱ्या पर्यटकांचा ड्रोन व्हिडीओ कारवारचा नाही! वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment