Press "Enter" to skip to content

विमान क्रॅश झाल्याची दृश्ये असणाऱ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!

धावपट्टीवर विमान उतरत असताना विमान क्रॅश झाल्याची दृश्ये असणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. त्या विमानावर ‘इंडोनेशिया गरुडा’ (Garuda Indonesia)असे लिहिलेले आहे.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक विवेक शिनगारे आणि निलेश घरत यांनी व्हॉट्सऍपवर देखील हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने ऍडव्हान्सड् कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता युट्युबवर 2 मे 2020 रोजी ‘बॉपबिबन’ या व्हेरीफाईड चॅनलवरून अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले.

या व्हिडीओच्या 05.55 मिनिटाच्या पुढील दृश्ये आणि व्हायरल व्हिडीओतील दृश्ये तंतोतंत जुळणारी आहेत.

Bopbibun youtube video screenshot comparison with viral video ss

या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ खरा नसून ‘सिम्युलेशन’ म्हणजेच कम्प्युटरवर बनवलेला आहे. यात दिसणारी दृश्ये वास्तवात घडलेली नाहीत असेही लिहिलेले आहे.

Source: Youtube

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हा व्हायरल व्हिडीओ सत्य नसून कम्प्युटरवर बनविला असल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणजेच व्हायरल दावे फेक आहेत.

हेही वाचा: थर्माकॉल पासून साखर बनवली जातेय? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा