Press "Enter" to skip to content

लहान मुलांचे अपहरण करणारी ‘लेडीज गँग’ सक्रिय झालीय? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

लहान मुलांचे अपहरण करणारी महिलांची एक टोळी सक्रीय झाली आहे. आपल्या मुलांची काळजी, घ्या अशा अर्थाच्या मेसेजसह सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये काही तरुणांनी या गँगमधील महिलांना रंगेहात पकडल्याची दृश्ये आहेत.

Advertisement

‘यदि आपके बच्चे पार्को में खेल रहे हैं तो ध्यान रखें… बच्चों को चुराने वाले गैंग सक्रिय हैं, अपने बच्चों को किसी के संरक्षण में ही छोड़े।’ अशा कॅप्शनसह व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अर्काइव्ह

ट्विटरप्रमाणेच फेसबुकवरही या डाव्यांचे व्हायरल होण्याचे प्रमाण मोठे आहे.

Child kidnnaper ladies gang facebook viral videos
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजू खरे आणि बाळू वैराळ यांनी व्हॉट्सऍपवरही हे व्हिडीओ अशाच काहीशा दाव्यांसह व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सदर व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले. ५.३३ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये ०.०७ मिनिटांवर एक ‘डिस्क्लेमर’ दिसते आहे. त्यात अतिशय छोट्या अक्षरांत काही सूचना लिहिलेल्या आहेत.

Viral video disclaimer slate
Source: Facebook

या सुचनेमध्ये असे लिहिले आहे की,

‘सदर व्हिडीओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला असल्याचे लक्षात घ्यावे. व्हिडीओमध्ये असलेल्या बाबी आपण मनावर घ्याव्यात किंवा तशा प्रकारे वागावे असा सल्ला आम्ही देत नाहीत. हा व्हिडीओ पाहून प्रेरित होऊन आपण केलेल्या कुठल्याही कृत्याची जबाबदारी ही सर्वस्वी तुमची असेल, याच्याशी आमचा काहीएक संबंध असणार नाही.

आम्ही प्रत्येक व्यक्तीचा, त्यांच्या व्यवसायांचा आणि संस्थांचा आदर करतो. आम्ही कुठल्याही पत्राची भूमिका उभी करतो त्यामागे केवळ मनोरंजनाचा हेतू असतो. आमचा कुणा व्यक्ती किंवा समुदायाच्या भावना दुखावण्याचा कसलाही हेतू नसतो.’

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये सदर व्हायरल व्हिडीओ नेमका कुणी व कधी बनवला आहे याविषयी ठोस माहिती मिळाली नाही परंतु तो बनावट असल्याचे, स्क्रिप्टेड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपल्या मुलांची काळजी घ्यावी यात कुणाचेही दुमत नसेल परंतु अशा व्हिडीओजमुळे दहशतीचे, भीतीचे वातावरण पसरले जात आहे. यातून केवळ संशयाच्या आधारे कुणा व्यक्ती किंवा समुद्याला नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘चेकपोस्ट मराठी’ आपणास आवाहन करत आहे की हे व्हिडीओज फॉरवर्ड करू नका, तसे करणाऱ्यांच्या निदर्शनास ही बातमी आणून द्या.

हेही वाचा: ‘हलाल’ म्हणून मुस्लीम स्वयंपाकी मिसळतात अन्नात थुंकी? उच्च न्यायालयात दिली कबुली?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा