Press "Enter" to skip to content

बाजूलाच खोल दरी असताना अरुंद रस्त्यावर कारच्या यु-टर्नचा व्हायरल व्हिडीओ फसवा, वाचा सत्य!

एका बाजूला खोल दरी असताना अरुंद रस्त्यावर यु-टर्न घेणाऱ्या कारचा हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. एवढेच नव्हे तर ’80 point turn’ असे कॅप्शन देत काही माध्यमांनी या व्हिडिओच्या संदर्भाने बातम्या देखील दिल्या आहेत.

Advertisement

ट्विटरवर शेअर होत असलेल्या या व्हिडीओविषयी ‘टीव्ही ९ मराठी‘, ‘ABP तमिळ‘ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस‘ सारख्या माध्यमांनी बातम्या केल्या आहेत.

Source: TV9 Marathi

‘लाईव्ह हिंदुस्थान’च्या युट्यूब चॅनेलवरून देखील हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स रिव्हर्स ईमेज सर्च केल्यानंतर असे लक्षात आले की सदर व्हिडीओ डिसेंबर 2021 मधील आहे. ‘ड्रायव्हिंग स्कील’ नावाच्या युट्युब चॅनलवर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ आहेत, त्यापैकीच हा एक.

याच चॅनेलवरून 25 डिसेंबर 2021 रोजी ‘The driving expert demonstrates the very narrow road U-turn skills” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

याच यु-टर्नचा दुसऱ्या बाजूने शूट केलेला एक दुसरा व्हिडीओदेखील आमच्या हाती लागला. त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थेट दरी नसून खाली दुसरा एक रस्ता आहे.

या चॅनलवर याच ठिकाणी दुसरी देखील कार यु-टर्न मारतानाचा व्हिडीओ आहे. या चॅनलचे स्थळ ‘हॉंग कॉंग’ असल्याचे नमूद केले आहे. सदर दृश्ये तेथीलच आहेत की नाहीत याची पडताळणी होऊ शकली नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की अरुंद रस्त्यावर यु-टर्न मारत असलेली कार कुठल्या खोल दरीच्या बाजूला नसून या रस्त्याच्या खालीसुद्धा दुसरा एक रस्ता आहे. अर्थात एवढ्या छोट्या रस्त्यावरून गाडीचा यु-टर्न मारणे मोठे कसब आहे. मात्र भारतीय माध्यमे या व्हिडीओद्वारे जो थरार दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, ती वाचकांची एक प्रकारे फसवणूक आहे.

हेही वाचा: चक्क अंड्याची शेती? वाचा चकित करणाऱ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा