Press "Enter" to skip to content

त्या चिमुरडीच्या धाडसाचे कौतुकच! पण ना ती चिमुरडी युक्रेनिअन, ना तो सैनिक रशियन!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक छोटी मुलगी मुठ आळवळून एका बंदूकधारी सैनिकाला खडसावताना दिसतेय. व्हिडिओत दिसणारा सैनिक शांतपणे उभा आहे. तो सैनिक त्या चिमुकलीचं म्हणणं ऐकून घेतो आणि थोड्या वेळाने निघून जातो. ती मुलगी परत मुठी आवळून त्याच्या पाठीमागे जातेय. हा व्हिडीओ सध्याच्या युक्रेन-रशिया युद्धाच्या संदर्भाने शेअर केला जातोय.

Advertisement

याच व्हायरल व्हिडिओच्या आधारे ‘लोकमत’ने बातमी देखील प्रसिद्ध केली आहे. ‘देशाला वाचवण्यासाठी रशियन सैनिकाशी एकटी नडली चिमुरडी’ अशा हेडलाइनखाली ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Source: Lokmat

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता हा व्हिडीओ नोक्टा ग्रुप या युट्यूब चॅनेलवरून 25 डिसेंबर 2012 रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये व्हिडिओतील मुलीचे नाव अहद तमिमी (Ahed Tamimi) असून ती पॅलेस्टिनीअन असल्याची माहिती देण्यात आली आहे. अहद व्हिडिओतील सैनिकाकडे आपला भाऊ कुठे आहे, अशी विचारणा करतेय.

2012 सालच्या या व्हिडिओनंतर अहद तमिमीचा आणखी एक व्हिडिओ 2017 मध्ये देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती इस्रायली सैनिकाच्या तोंडात मारत असल्याचे बघायला मिळाले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 16 वर्षीय अहदला 8 महिन्यांसाठी अटक करण्यात आली होती.

इस्रायली सैनिकाकडून अहद तमिमीचा धाकटा भाऊ मुहम्मद तमिमी (Mohammed Tamimi) याच्यावर गोळीबार केल्यानंतर तो कोमामध्ये गेला होता. इस्रायली सैनिकांनी तमिमीच्या घरावर अश्रूधुराचा हल्लाही केला होता. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी अहद तमिमीने इस्रायली सैनिकाच्या श्रीमुखात भडकावली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचा सध्याच्या युक्रेन-रशिया युद्धाशी काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडीओ 2012 मधील असून व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीचे नाव अहद तमिमी असे आहे. ती पॅलेस्टिनची असून व्हिडिओतील सैनिक इस्रायली आहे.

हेही वाचा- रशियाने घर आणि गाडीवर भारतीय तिरंगा लावणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची ग्वाही दिलीय? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा