Press "Enter" to skip to content

टँकरमधून महिला आणि बालकांची तस्करी चालू होती? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य!

महिला आणि बालकांची टँकरमधून तस्करी चालू होती. कुर्दीस्तान पोलिसांच्या महिला ऑफिसरने पकडल्यामुळे सगळा प्रकार उघडकीस आला असे सांगत सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. (human & child trafficking by tanker)

व्हायरल व्हिडीओसोबत फिरणारे कॅप्शन इंग्रजीतून आहे. त्यात असे म्हंटले आहे की ‘सिरीयातून इराककडे जाणाऱ्या एका ट्रकची चौकशी कुर्दीस्तान सीमेवर असणाऱ्या महिला पोलीस ऑफिसर्सने केली. ऑईल टँकरमध्ये नेमकी काय सामुग्री आहे याचा तपास करताना महिला आणि बालकांच्या तस्करीचा प्रकार उघड झाला. आपण कल्पनाही करू शकत नाही एवढ्या मोठ्या लेव्हलचं आहे हे प्रकरण. खरंच या कुर्दिश महिला पोलिस ऑफिसर जबरदस्त आहेत.’

Advertisement

ट्विटर युजर दिनेश जोशी यांनी यासंबंधी केलेल्या ट्विटला बातमी करेपर्यंत जवळपास २२०० पेक्षा जास्त लोकांनी रीट्विट केले होते.

अर्काइव्ह लिंक

फेसबुक युजरनेम ‘सिव से सनातन’ असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा हाच व्हिडीओ (human & child trafficking by tanker) याच कॅप्शनसह पोस्ट केला आहे.

https://www.facebook.com/watch/?v=402070777860140

फेसबुकवर अनेक युजर्सने हेच दावे कॉपीपेस्ट करून व्हिडीओ व्हायरल करण्याचे काम केले आहे. (human & child trafficking by tanker)

FB posts to viral truck from syria to iran trafficking ladies and children checkpost marathi
Source: Facebook

हा व्हिडीओ व्हॉट्सऍपवर देखील याच दाव्यांसह फिरत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन आणि निसार अली यांनी निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओच्या किफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून आणि काही ऍडव्हान्स किवर्ड्सच्या सर्च मधून काही वेगळीच माहिती समोर आली.

कुर्दिश मिडिया नेटवर्कच्या ‘Rudaw‘ या न्यूज पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या घटनेत झालेल्या संवादाचे इंग्रजीत भाषांतर आणि त्याची पार्श्वभूमी दोन्ही व्यवस्थितपणे लिहिली आहे.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की महिला पोलीस ऑफिसरने टँकर अडवून तपास चालू केला. तो उघडायला भाग पाडले आणि त्यातून काही महिला आणि लहान मुले बाहेर आली. या सर्व प्रकारचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात होते तेव्हा टँकरमधून बाहेर आलेली पहिली महिला म्हणते,

‘व्हिडीओ करू नका. आम्हीही माणसं आहोत, जनावरे नाहीत.’

ऑफिसरने त्यांना इराकचे आहात का विचारल्यावर महिलेने केवळ मान हलवून होकार दिला. टँकरमधून ४ महिला आणि ६ बालके बाहेर आली. त्यापैकी केवळ एका मुलात रडण्याचे त्राण होते बाकी सगळे बेशुद्धावस्थेत असल्यासारखे दिसत होते.

बातमीत लिहिल्याप्रमाणे हे सर्व ‘अल-होल कॅम्प’ मधून आले होते. सिरीया, इराक आणि इतर काही देशांमधील ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असणाऱ्या लोकांना जेव्हा ताब्यात घेतले गेले तेव्हा त्यांच्या बायकांना आणि मुलांना या डीटेन्शन कॅम्पमध्ये आणून डांबले.

Rudaw news screenshot checkpost marathi
Source: Rudaw

या कॅम्पमध्ये जवळपास ६८००० जन आहेत, त्यापैकी तब्बल ४५००० केवळ बालके आहेत. या माहितीला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘अल जजीरा’ वृत्तपत्रातील एका बातमीतून दुजोरा मिळाला आहे.

अल-होल कॅम्पचा फोटो:

A view of al-Hol displacement camp in Hasaka governorate, Syria [Ali Hashisho/Reuters]
A view of al-Hol displacement camp in Hasaka governorate, Syria [Ali Hashisho/Reuters]

या कॅम्पमधून सुटण्यासाठी लहान मुलांना झोपेच्या गोळ्या देऊन बायका टँकरच्या मदतीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. ही युक्ती काही नवी नसल्याने पोलीस ऑफिसर्सने चौकशी केली होती. या महिलांना आणि बालकांना पुन्हा त्या डीटेन्शन कॅम्पमध्ये नेऊन सोडण्यात आले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की कुर्दिश पोलीस ऑफिसर्सने पकडलेल्या टँकरमधून महिला आणि बालकांची तस्करी (human & child trafficking by tanker) चालू नव्हती. ते डीटेन्शन कॅम्पमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मुलांना झोपेच्या गोळ्या दिल्याने ते गुंगीत होते, बेशुद्ध अवस्थेत नव्हते. या सर्वाना पुन्हा डीटेन्शन कॅम्प नेऊन सोडले आहे.

हेही वाचा: ‘शिवनाग’ वृक्षाचे मूळ कापल्यानंतर १५ दिवस हालचाल करते? जाणून घ्या सत्य!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

4 Comments

  1. […] वाचा: टँकरमधून महिला आणि बालकांची चालू होती तस्करी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे […]

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा