Press "Enter" to skip to content

डॉक्टर कोरोना रुग्णाचा गळा दाबून मारत असल्याचे दावे करत व्हायरल झालेल्या व्हिडीओचे सत्य वेगळेच!

हॉस्पिटल बेडवर असलेल्या वृद्ध रुग्णाचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचा एक व्हिडीओ सोशल मिडिया मध्ये व्हायरल होत आहे. (doctor strangling corona patient)

Advertisement

‘कोरोनाच्या नावाखाली लोकांना मारत आहेत, हा व्हिडीओ एवढा शेअर करा की डॉक्टर पकडला गेला पाहिजे’ अशा टेक्स्ट ग्राफिक्स सह तो व्हिडीओ सोशल मीडियात अनेकांकडून शेअर केला जातोय.

फ्रेंड्स हा व्हिडिओ खरा आहे का …..अंगाला काटा येणार हे दृश्य किती भयान आहे ….. आणि खरं असेल तर हा व्हिडिओ एवढा शेअर करा की हा पकडला गेला पाहिजे 👍👍👍👍🤐🤐🤐🤐

Posted by Aru Sonanwane on Sunday, 18 April 2021

अर्काइव्ह लिंक

‘तू माझी जानू’ नावाच्या इंस्टाग्राम पेजवर (doctor strangling corona patient) हा व्हिडीओ पोस्ट केला गेलाय. त्यास आजतागाय तब्बल ९१,६५६ लोकांनी पाहिले आहे. किती जणांनी शेअर केलाय, डाऊनलोड केलाय याची आकडेवारी उपलब्ध नाही.

चेकपोस्ट मराठीचे वाचक हृषीकेश तेलंग आणि शंकर साळवे यांनी सदर व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी करण्याची विनंती केली आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कि फ्रेम्स गुगलवर रिव्हर्स ईमेजसर्च करून पाहिल्या तशी एकेके माहिती उलगडू लागली.

१. व्हिडीओ भारतातील नाही.

साधारण १४ ते २० मे २०२०च्या आसपास सदर व्हिडिओ सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे व्हिडिओसोबत असणारे कॅप्शन्स बंगाली भाषेतील होते. पोस्ट करणाऱ्या युझर्सच्या प्रोफाईल चाळल्यानंतर असे लक्षात आले की हे सर्व बांग्लादेशातील आहेत. त्या सर्व पोस्ट फेसबुकच्या ‘या’ लिंकवर पाहू शकता.

२. व्हिडीओतील दुसरी व्यक्ती डॉक्टर नाही.

व्हायरल व्हिडिओ शेअर झालेल्या फेसबुक पोस्ट्सच्या कॅप्शनमध्ये नेमके काय लिहिले आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही गुगल ट्रान्सलेटरची मदत घेतली आणि असे लक्षात आले की दुसरी व्यक्ती डॉक्टर नसून त्या वृद्ध व्यक्तीचा मुलगा आहे. ‘वृद्ध आजारी बापाला मुलगा हॉस्पिटल बेडवर गळा दाबून मारत आहे. हे देवा अशा मुलाचा सर्वनाश कर.’ अशा अर्थाचे त्ते कॅप्शन्स आहेत.

Google translation of viral video caption
Credit: Google Translate

३. तो मुलगा वडिलांचा गळा दाबत नाहीये.

या बांग्लादेशी व्हिडीओची आणि त्या सोबतच्या दाव्यांची सत्यता पडताळताना आम्हाला एक युट्युब व्हिडीओ सापडला. बांग्लादेशी युट्युबर सायेम शिरीन यांनी सदर व्हायरल व्हिडीओला एन्लार्ज करून त्याची सत्यता समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये त्या म्हणतायेत की व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल की तो मुलगा वडिलांचा गळा दाबत नसून जबरदस्तीने गोळी तोंडात भरवत आहे. त्याचा हात गळ्याजवळ नसून तोंडाजवळ आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये (doctor strangling corona patient) व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातीलसुद्धा नाहीये हे स्पष्ट झाले. व्हायरल व्हिडिओ बांग्लादेशातील असून त्यातील दोघे बाप आणि मुलगा आहेत. यामध्ये डॉक्टरचा काहीएक संबंध नाही.

कोरोनाच्या नावाखाली अशा पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर विश्वास न ठेवण्यातच शहाणपण आहे. अशा व्हायरल व्हिडिओजमुळे लक्षणे जाणवत असूनही लोक दवाखान्यांत जाणे टाळत आहेत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.

हेही वाचा: ‘मुंबईत कोरोनाच्या नावावर अवयव तस्करीचा घोटाळा’ सांगण्यासाठी शेअर केले जाताहेत लखनऊचे फोटोज !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा