उत्तर प्रदेशसह इतर चार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता इतर चारही राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. अशात सोशल उत्तर प्रदेशच्या निकालांच्या संदर्भाने ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम (Ajit Anjum) यांचे म्हणून एक ट्विट व्हायरल होतेय.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये योगी जिंकले तर आपण पत्रकारिता सोडून दिल्लीतील बिल्लिमरानमध्ये चिकन चिकन-पकोड्यांचे दुकान सुरु करू, असा शब्द अजित अंजुम यांनी दिला होता. आता अजित अंजुम आपला शब्द पाळणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल ट्विटच्या स्क्रीनशॉटमध्ये अकाउंट ट्विटरच्या ‘ब्लू टीक’ने व्हेरीफाईड असल्याचे दर्शविण्यात आले आहे. मात्र वास्तविकरीत्या अजित अंजुम यांचे अकाउंट अद्यापपर्यंत तरी ट्विटरकडून व्हेरीफाईड करण्यात आलेले नाही. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ब्लू टीक बघायला मिळत नाही. म्हणजेच व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये ब्लू टीक जोडून ते खरोखरच अजित अंजुम यांचे असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी खुद्द अजित अंजुम यांनीच आपल्या अकाऊंटवरून व्हायरल स्क्रिनशॉट शेअर करत तो फेक असल्याचे सांगितले आहे. अंजुम यांनी देखील आपले अकाउंट व्हेरीफाईड नसल्याचे स्पष्ट केले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर जेष्ठ पत्रकार अजित अंजुम यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये योगी जिंकले तर आपण पत्रकारिता सोडून दिल्लीतील बिल्लिमरानमध्ये चिकन चिकन-पकोड्यांचे दुकान सुरु करू, असे ट्विट केले नव्हते. त्यांच्या नावाने व्हायरल ट्विटचा स्क्रिनशॉट फेक आहे.
हेही वाचा- भाजप कार्यकर्त्यांनी 500 रुपये देऊन मतदान न करताच मतदाराच्या बोटावर लावली शाई?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment