Press "Enter" to skip to content

भारतीय सैन्यातले ५० जवान मारले गेले आणि ७५ बंदी बनवले सांगणारा स्क्रिनशॉट फेक!

‘भारतीय सैन्याकडून चीनी सैन्याचा अपमान केला जात होता. याचाच बदल म्हणून आम्ही ५० भारतीय जवान मारले असून ७५ जवानांना बंदी बनविण्यात आले. लवकरच आम्ही क्लीन लडाख ऑपरेशन सुरु करू. भारताला लडाखमधून हुसकावून लावण्यासाठी फक्त एकच महिना पुरेसा आहे.’

Advertisement

जिंग शी या ट्वीटर हँडलवरून करण्यात आलेलं हे ट्वीट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतंय. ‘युथ ऑफ काश्मीर’ या  फेसबुक पेजवरून ‘बिग ब्रेकिंग’ म्हणून हे ट्वीट शेअर करण्यात आलंय. ३९ जणांनी ही पोस्ट शेअर देखील केलीये. 

#BIG_BREAKING Jing xi tweets (is it true )

Posted by Youth icon of kashmir on Tuesday, 16 June 2020

गल्वान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर जिंग शी या अकाऊंटवरून करण्यात आलेलं हे ट्वीट व्हायरल व्हायला लागलं. ‘जिओ न्यूज काश्मीर’ या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आलेला ट्वीटचा स्क्रीनशॉट जवळपास ८७२ लोकांनी शेअर केला.

credit: facebook

ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागल्यानंतर अमनदीप सिंग या युजरने ट्वीटरच्या माध्यमातून थेट प्रधानमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रकरणी लक्ष्य घालण्याचं आवाहन केलं.

पडताळणी:

जिंग शी या अकाऊंटवरून केल्या गेलेल्या व्हायरल ट्वीटची पडताळणी करण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी संबंधित ट्वीटर अकाऊंटला भेट दिली.

अकाऊंटला भेट दिली असता हे अकाऊंट मार्च २०२० मध्ये म्हणजे साधारणतः ३ महिन्यांपूर्वी काढण्यात आल्याचं तसेच अकाऊंटला जवळपास ११ हजार ८०० लोक फॉलो करत असल्याचं लक्षात आलं.

या अकाऊंटवरून शेवटचं ट्वीट ७ जून रोजी म्हणजेच साधारणतः १० दिवसांपूर्वी करण्यात आल्याचं समजलं. अकाऊंटवरून करण्यात आलेलं ७ जूनचं शेवटचं ट्वीट हेच या अकाऊंटवरच पिन ट्वीट देखील असल्याचं आमच्या लक्षात आलं.

त्यानंतर आम्ही व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉट मधील ट्वीट शोधण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला संपूर्ण टाईमलाईनवर कुठेही ते ट्वीट सापडलं नाही. शिवाय व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉट मधील ट्वीट आणि त्या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये २ गोष्टींचे साम्य असल्याचे आमच्या लक्षात आले.

पहिली गोष्ट अशी की दोन्हीही ट्वीट हे अकाऊंटवरील ‘पिन ट्वीट’ असल्याचं दिसतंय, शिवाय दोन्हीही ठिकाणी ट्वीटसोबत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा फोटो वापरण्यात आलेला आहे. जिंग शी अकाऊंटवरील करण्यात आलेलं शेवटचं आणि ‘पिन ट्वीट’ आपण बघू शकता.

व्हायरल स्क्रीनशॉट बारकाईने बघितला असता एक गोष्ट अजून आपल्या लक्षात येईल ती अशी की व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये ट्वीटची तारीखच नाही. शिवाय शेवटचं ट्वीट ७ जून रोजीचं असल्याने कालच्या घटनेशी या ट्वीटचा काहीही संबंध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की जिंग शी या अनधिकृत अकाऊंटच्या नावाने व्हायरल होत चाललेला स्क्रीनशॉट फेक असून तो एडीटेड आहे.

त्याच अकाऊंटवरच्या शेवटच्या पिन ट्वीटमध्ये बदल करून नवीन स्क्रीनशॉट व्हायरल करण्यात येतोय. या स्क्रीनशॉटचा वस्तूस्थितीशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा:
चीनचे ५ सैनिक मारल्याच्या बातम्या मिडीयाने दिल्या; पण चीनी पत्रकाराच्या भरोश्यावर

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा