Press "Enter" to skip to content

राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाचे डेकोरेशन म्हणून फिरतोय हैद्राबादच्या मंदिराचा व्हिडीओ!

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन (ram mandir bhumi pujan) सोहळा ५ ऑगस्ट रोजी संपन्न

Advertisement
होणार आहे पण त्या आधीच अनेकांकडून कळत नकळत फेक दाव्यांचा प्रचार प्रसार होताना दिसतोय. असाच एक कार्यक्रमाच्या तयारीचा, डेकोरेशनचा व्हायरल व्हिडीओ.

‘भूमी पूजन मंडप , अयोध्या …डोळ्याचे पारणे फिटवणारी सजावट ,खरच धन्य आहेत भारतीय …कारण मोदी है तो ही मुमकीन है ।’

या कॅप्शनला कॉपीपेस्ट करत अनेक मराठी भाषिक लोक आपापल्या फेसबुक वॉलवर, ग्रुप्सवर, व्हॉट्सऍपवर सदर व्हिडीओ व्हायरल करताना दिसत आहेत.

‘कोल्हापूर श्री महालक्ष्मी टुडे दर्शन’ च्या फेसबुक वॉलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. २४० लोकांनी याला शेअर केलेय.

FB Ram mandir decoration video.jpg
source: facebook

‘Decoration of Pandal for bhumi pujan of Ram Mandir, Ayodhya.’ या इंग्रजी कॅप्शनसह तर काहींनी ‘भूमि पुजन वाले मंडप और अयोध्या की सजावट देखकर आंखें फटी की फटी रह जाएगी’ या हिंदी कॅप्शनसह व्हिडीओ शेअर केलाय.

FB Ram mandir decoration video2.jpg
FB Ram mandir decoration video2.jpg

फेसबुकवर सर्च बार मध्ये ‘‘भूमी पूजन मंडप , अयोध्या …डोळ्याचे पारणे फिटवणारी सजावट ,खरच धन्य आहेत भारतीय …कारण मोदी है तो ही मुमकीन है ।’‘ हे कॅप्शन टाकले तरी कित्येकांनी शेअर केलेले व्हिडीओज आपल्याला मिळतील.

FB Ram mandir decoration video viral posts

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास सदर व्हिडीओ आल्यानंतर आम्ही यातील एक फ्रेम घेऊन रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिले.

आमच्यासमोर युट्युबवरील एक व्हिडीओ आला. १.५७ मिनिटाच्या या व्हिडीओमधील दृश्ये आणि व्हायरल व्हिडीओमधील दृश्ये तंतोतंत जुळत आहेत.

व्हायरल व्हिडीओ आणि युट्युब व्हिडीओची तुलना:

comparison of viral video with youtube video.jpg

मूळ व्हिडीओ कुठला?

व्हायरल व्हिडीओमधील दृश्ये तंतोतंत जुळल्यानंतर आम्ही त्या मूळ व्हिडीओचे व्यवस्थित परीक्षण केले. व्हिडीओ अपलोड करण्याची तारीख आहे ५ जानेवारी २०२० म्हणजे तब्बल ६-७ महिने जुना. व्हिडीओ टायटल मध्ये ‘श्री रंगनाथ स्वामी मंदिर, जीयागुडा, हैद्राबाद असे लिहिले आहे.

youtube video dated 5th Jan 2020
Source: Youtube

या मंदिराच्या नावाने एकदा सर्च करून पाहिले असता आम्हाला गुगलवर सुद्धा त्याचे मूळ लोकेशन सापडले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’ने केलेल्या पडताळणीमध्ये राम मंदिर भूमिपूजन (ram mandir bhumi pujan) कार्यक्रमासाठीची सजावट म्हणत व्हायरल होत असणारा व्हिडीओ मुळचा हैद्राबादमधील मंदिराचा असल्याचे निष्पन्न झाले.

आपणासही असे कुठलेली व्हायरल ऑडीओ-व्हिडीओ दावे आले तर ‘चेकपोस्ट मराठीच्या ९१७२०११४८० या व्हॉट्सऍप नंबरला पाठवा आणि पडताळणी करून घेतल्या नंतरच फॉरवर्ड करा.

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या इतर व्हायरल दाव्यांची पोलखोल:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामायणावर आधारित डाक तिकीट जारी केलेत?

‘अयोध्येतील राम मंदिराचे थ्री डी मॉडेल’ म्हणत शेअर होतोय जैन मंदिराचा व्हिडीओ!

राम मंदिर निर्मितीच्या आनंदात स्पेन मध्ये ढोलताशे? फेक दावे व्हायरल!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा