Press "Enter" to skip to content

‘दलित मुलीवर मंदिरात बलात्कार’ म्हणत घटनेला फेक गोष्टी जोडून दिला जातोय जातीय रंग!

अल्पवयीन दलित मुलीवर मंदिरात सामुहिक बलत्कार (dalit girl gangraped in temple) झालाय असे सांगणाऱ्या एका पोस्टचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होतोय.

Advertisement

अवघ्या १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेची माहिती देणारी मनोज गौतम या फेसबुक युजरची पोस्ट सध्या विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आणि व्हॉट्सऍप ग्रुप्सवर व्हायरल होतेय. ही बाब ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी निदर्शनास आणून दिलीय.

मुलीच्या मृतदेहाचा फोटो आणि काही मजकूर असे त्या व्हायरल पोस्टचे स्वरूप आहे.

‘लालसोट विभागाच्या बगडी गावात १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बारा लोकांपेक्षा अधिक जणांनी सामुहिक बलात्कार केला. सर्व साथीदारांनी याविरुद्ध आवाज उठवायला हवा. जेणेकरून पिडीतेच्या कुटुंबाला न्याय मिळेल, अपराध्यांवर कठोरात कठोर कारवाई होईल. अपराधी कुणीही असो त्यास शिक्षा मिळायलाच हवी अशी प्रशासनाला मी विनंती करतो’

असा मजकूर त्यात आहे.

dalit girl raped in temple viral screenshot

या पोस्टकर्त्याने स्वतःच्या मूळ पोस्टमध्ये काही बदल करून खाली “इस बहन के साथ अत्याचार मंदिर के अंदर ले जाकर किया गयाअब मैं पूछना चाहूंगा अंध भक्तों से अब कहां गए देवी देवता?देवी के मंदिर के अंदर घटना?” ही वाक्ये जोडली आहेत. (dalit girl gangraped in temple)

फिर हुई मानवता को शर्मसार कर देने वाली घटना लालसोट क्षेत्र के ग्राम बगड़ी में 12 साल की एक दलित नाबालिग लड़की के साथ एक…

Posted by Manoj gautam on Sunday, 9 August 2020

ही पोस्ट, बातमी करेपर्यंत ११०० पेक्षा जास्त लोकांनी शेअर केली आहे.

पडताळणी :

व्हायरल पोस्ट ‘चेकपोस्ट मराठी’ पर्यंत आली. आम्ही तिचे बारकाईने निरीक्षण केल्यावर शंकेची पाल चूकचुकली कारण मजकुरात पिडीतेचे वय १२ वर्षे लिहिले आहे आणि सोबत जोडलेल्या फोटोतील युवती १२ वर्षे वय असलेली नक्कीच वाटत नाहीये.

१. फोटोचा घटनेशी काहीही संबंध नाही:

व्हायरल पोस्ट मधल्या फोटोचं बारकाईने निरीक्षण केल्यास लक्षात येईल फोटोत जमिनीवर तीन वस्तू पडल्या आहेत आणि तीन्हींना मार्किंग करून ठेवले आहे. एक आहे बंदूक, दुसरी हाय हिल्स सँडल्स आणि तिसरे कंडोम दिसलं.

हे जरा संशयास्पद वाटलं म्हणून आम्ही त्या फोटोला गूगल रिवर्स इमेजवर सर्च करून पाहिलं. तेव्हा असं दिसलं कि हा फोटो आणि अशाच प्रकारचे अजून काही फोटो 123rf.com या वेबसाईटवर आहेत. हे फोटो सोरापोप उदोम्स्री या फोटोग्राफरने काढले फोटो आहेत. मुळात हे फोटोज कुठल्या सत्य घटनेचे नसून केवळ वेगवेगळ्या पद्धतीने ड्रामा रचून केलेलं फोटोशूटआहे. यातील युवती कुणी मॉडेल आहे.

२. वयात गल्लत:

‘चेकपोस्ट मराठी’ने त्या व्हायरल पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या लालसोट या राजस्थान मधल्या दौसा जिल्ह्यात कुठली बलात्काराची घटना घडली आहे का याचा तपास सुरु केला, तेव्हा टाईम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीत असं समजलं की एका १७ वर्षीय मूक-बधीर मुलीवर पाच जणांनी बलात्कार केलाय.

याचाच अर्थ पोस्टकर्त्याला स्वतःलाच घटनेचे बारकावे नीटसे माहित नाहीत. घटनेतील पीडिता १७ वर्षीय आहे आणि बलात्कार करणारे ५ अपराधी आहेत.

३. काय आहे नेमकी घटना?

१७ वर्षीय मूक-बधीर मुलगी दुकानात जात असताना तिला आरोपींनी बळजबरी एका गाडीत बसवलं आणि गावाबाहेर नेत तिच्यावर बलात्कार केला. सकाळी ११ च्या सुमारास तिचे अपहरण करण्यात आले होते आणि संध्याकाळी ५ च्या सुमारास तिला परत गावात आणून सोडलं.

४. मुलगी दलित आहे हे खरे

लालसोट पोलिस स्टेशनला आणि अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तेथील काही स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधून चौकशी केली. यात अशी माहिती मिळाली की, पिडीत मुलगी राजस्थान मधल्या जाती व्यवस्थे प्रमाणे SC कॅटेगरी मध्ये येते तर आरोपी आदिवासी म्हणजे ST कॅटेगरी मध्ये येतात.

५. घटना मंदिरात झाली नाही:

पिडीतेला मंदिरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला असं पोस्टकर्त्याने लिहिलं आहे. पण तिथल्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार मंदिरात नव्हे तर मंदिराच्या परिसरात घडला असल्याचं समजलं. टाईम्स ऑफ इंडिया आणि टाईम्स नाऊ दोन्हीच्या बातम्यांमध्ये मंदिराचा उल्लेख नाहीये परंतु टाईम्स नाऊच्या व्हिज्युअल्समध्ये मंदिराच्या मागे जाणारे पोलीस दिसत आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’ने केलेल्या पडताळणी मध्ये असं सिद्ध झालं की जो फोटो त्या पोस्ट सोबत व्हायरल होत आहे तो फेक आहे. पिडीत मुलगी १२ वर्षांची नसून १७ वर्षांची आहे. ती मूक बधीर होती. आरोपींची संख्या पाच होती एक डझन नव्हे.

मुळात ज्या जातीय परिप्रेक्ष्यातून या घटनेकडे पोस्टकर्ता पहात आहे तेच फोल ठरत आहे कारण आरोपी तथाकथित सवर्ण जातीचे नसून ST कॅटेगरीचे आहे. आणि महत्वाचं म्हणजे घटना मंदिराच्या आत नव्हे तर बाहेर घडलीय आसपासच्या परिसरात.

हेही वाचा: इंस्टाग्राम वर मुलींचे न्यूड फोटोज टाकून गँग रेप करणाऱ्या मुलांची एक्स्पोज लिस्ट फेक!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा