Press "Enter" to skip to content

शहीद भगतसिंह यांच्या बहिणीच्या मृत्यू संबंधी दिशाभूल करणारी पोस्ट व्हायरल !

सोशल मिडीयावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की शहीद भगतसिंह यांच्या ९६ वर्षीय भगिनी प्रकाश कौर (parkash kaur bhagat singh sister) यांचा मृत्यू झालाय. कुठल्याही राजकीय नेत्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही, पण तुम्ही मात्र त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन करण्यात येतंय.

Advertisement

‘एक भारत’ या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आलेलं शहीद भगतसिंहांच्या बहिणीच्या मृत्यूची बातमी देणारं हे ग्राफिक बातमी लिहीपर्यंत ६४९ युजर्सकडून शेअर केलं गेलंय.

अर्काइव्ह पोस्ट

ट्विटरवरून देखील हाच दावा करण्यात येतोय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी :

व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही गुगल सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘टाईम्स ऑफ इंडिया’ची बातमी मिळाली. या बातमीनुसार शहीद भगतसिंह यांच्या भगिनी प्रकाश कौर (parkash kaur bhagat singh sister) यांचं २०१४ सालीच निधन झालेलं आहे. 

Credit- TOI

२८ सप्टेंबर हा भगतसिंह यांचा जन्मदिवस. २०१४ मध्ये याच दिवशी प्रकाश कौर यांनी कॅनडामधील ब्रॅम्पटन येथे शेवटचा श्वास घेतला. निधनाच्या वेळी ९३ वर्षाच्या असणाऱ्या कौर या १९८० साली कॅनडामध्ये स्थलांतरीत झाल्या होत्या. आपल्या मुलासह त्या तिथे राहत होत्या, असं देखील या बातमीत सांगण्यात आलं आहे.

‘द हिंदू’ आणि ‘अमर उजाला’ यांनी देखील प्रकाश कौर यांच्या मृत्युच्या बातम्या दिल्या होत्या. ‘द हिंदू’च्या बातमीत मात्र त्याचं वय ९६ वर्ष असल्याचं म्हंटलंय, तर ‘अमर उजाला’च्या बातमीनुसार प्रकाश कौर यांनी १९६७ सालची पंजाब विधानसभेची निवडणूक लढल्याची माहिती मिळते.

१९६७ साली प्रकाश कौर यांनी भारतीय जनसंघाच्या तिकिटावर कोटकपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अकाली दलाचे हरभगवान सिंह यांनी ही निवडणूक जिंकली होती, तर प्रकाश कौर यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की शहीद भगतसिंह यांच्या बहिणीचा नुकताच किंवा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याचे दावे फेक आहेत. प्रकाश कौर यांचा मृत्यू जवळपास ६ वर्षांपूर्वी म्हणजेच २८ सप्टेंबर २०१४ रोजी कॅनडामध्ये झाला होता. सोशल मिडीयावर ६ वर्षांपूर्वीची बातमी चुकीच्या दाव्यांसह शेअर केली जात आहे.   

हे ही वाचा- ‘सिरिया’तील लहान मुलांच्या मृतदेहांना भारतीय म्हणत पसरवल्या जात आहेत अफवा!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा