Press "Enter" to skip to content

शिवसैनकाने पार्श्वभागावर गोंदविला संजय राऊत यांचा टॅटू? वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. व्हायरल फोटोमध्ये एक शिवसैनिक आपल्या पाठीवरील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा टॅटू शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवत असल्याचे बघायला मिळतेय.

Advertisement

शिवसैनिकाच्या पार्श्वभागावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा टॅटू देखील असल्याचे बघायला मिळतेय. उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हा फोटो न्याहाळत असल्याचे बघायला मिळतेय. शिवसैनिकाने संजय राऊत यांच्या टॅटूसाठी निवडलेल्या जागेवरून संजय राऊत यांची खिल्ली उडवली जातेय.

पडताळणी:

सोशल मीडियावरील व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला ट्विटरवर मूळ फोटो बघायला मिळाला.

शिवसेना म्हणजे निष्ठा अशा कॅप्शनसह ट्विट करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये फोटोत शिवसैनिकाच्या पाठीवर केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचाच टॅटू गोंदविण्यात आला असल्याचे बघायला मिळतेय. मूळ फोटोत संजय राऊत यांचा टॅटू नाही.

किवर्डसच्या आधारे अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता ‘टीव्ही 9 मराठी’च्या युट्यूब चॅनेलवर यासंदर्भातील बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार पाठीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा टॅटू गोंदविणाऱ्या शिवसैनिकांचे नाव रामण्णा जमादार असे असून ते सोलापूरमधील शेळगी भागातील रहिवासी आहेत.

शाखाप्रमुख पदावर असताना आपण हा टॅटू काढला असून टॅटू काढण्यासाठी 9 दिवस लागले. शिवसेनेत गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे आपण व्यथित असून 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जमादार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की शिवसैनिकाने आपल्या पार्श्वभागावर संजय राऊत यांचा फोटो गोंदविला असल्याचे दावे करत शेअर केला जात असलेला फोटो एडिटेड आहे. सोलापूर येथील रामण्णा जमादार या शिवसैनिकाने आपल्या पाठीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा टॅटू गोंदविला आहे.

हेही वाचा- राहुल गांधी पीठ ‘लिटर’ मध्ये मोजतात? मूळ व्हिडीओ पहा आणि सत्य जाणून घ्या!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा