Press "Enter" to skip to content

बांग्लादेशातील हिंसक मुस्लीम गर्दीचे फोटोज केरळातील म्हणून व्हायरल!

‘सोचिए इस तरह की भीड़ आपके इलाके, सोसाइटी, कॉलोनी पर बिलकुल ऐसे ही पहुंच जाए तो आप के पास इनके ‘स्वागत’ का ‘इंतजाम’ की व्यवस्था है या नहीं केरल का ये फ़ोटो’

Advertisement

या अशा कॅप्शनसह एक फोटो व्हायरल होतोय.

अनेकांनी कॅप्शन मधील शब्दन शब्द आहे असेच कॉपी पेस्ट करून हा फोटो शेअर केलाय. तर काहींनी या वाक्यांसह स्वतःची काही वाक्ये टाकली आहेत.

ट्विटर युजरनेम ‘राष्ट्रवादी अजय’ असणाऱ्या व्यक्तीने ‘हथियार अपने घर में इकट्ठा करो ना कि फैशनेबल चीज खरीदो’ असं सांगत शस्त्रसज्ज राहण्याचं आवाहन केलंय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी ‘Riots in Kerala’ या कीवर्ड्सच्या आधारे सर्च करून गेल्या दोन आठवड्यात काही मोठी घटना घडली आहे का याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला परंतु अशी कुठलीच बातमी आम्हाला सापडली नाही.

मग आम्ही व्हायरल ईमेज गुगलवर रिव्हर्स सर्च करून पाहिली असता हा फोटो असणारी सर्वात जुनी लिंक मे २०१३ मध्ये पब्लिश झालेली आढळली. ही लिंक आहे ‘टाईमतुर्क’ या न्यूज वेबसाईटची.

टाईम तुर्क‘मध्ये दिलेल्या माहिती नुसार बांग्लादेशमध्ये ‘हिफाजत-ए-इस्लाम’ने सरकार विरोधात जे बंड केले होते त्यावेळचा हा फोटो आहे. या हिंसक दंगलीत जवळपास १०० लोक मारले गेले होते आणि १०० च्या आसपास जखमी होते.

Time Turk News Screenshot
Source: Time Turk

याच घटनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही सर्च केले तेव्हा BBC ची ६ मे २०१३ची एक बातमी सापडली ज्याद्वारे आधीच्या महितीला पुष्टी मिळाली.

अलामीच्या वेबसाईटवर या दंगलीवेळचे काही फोटोज उपलब्ध आहेत. ज्यामध्ये व्हायरल ईमेज मधील निळा कुर्ता घातलेली व्यक्ती आपणस वेगवेगळ्या अँगल्समधून पहायला मिळेल.

फोटोजखाली असणाऱ्या डीटेल्स मध्ये फोटोग्राफरचे नाव फिरोज अहमद असे लिहिले असून हे ५ मे २०१३ रोजीचे असल्याचं लिहिलंय. बातम्यांमधील तारीख आणि हे फोटो क्लिक करण्याची तारीख तंतोतंत जुळतेय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल ईमेज केरळची असल्याचा दावा खोटा निघाला. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेले फोटोज बांग्लादेशातील ढाका शहरातील आहेत आणि घटनेला आता तब्बल ७ वर्षे उलटून गेलीत.

हेही वाचा: केरळात हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी अटक झाली; पण अमजद अली, तमीम शेख यांना नाही !

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा