Press "Enter" to skip to content

टाईम्स स्क्वेअरच्या भव्य जाहिरात फलकांवरील श्रीरामाच्या प्रतिमांचे व्हायरल फोटोज फेक!

अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या हर्षोल्हासात अनेकजण समोर येतील ते दावे पुढे पाठवत आहेत. त्यातीलच एक म्हणजे अमेरिकेच्या टाईम्स स्क्वेअरवर रामाच्या (times square shree ram) भल्या मोठ्या 3D प्रतिमा झळकावल्या असल्याचे दावे.

Advertisement

अशा प्रकारचे फोटोज सोशल मीडियात व्हायरल होत असल्याचं ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक कुंदन तावडे यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यांनी व्हायरल होत असणाऱ्या फोटो सोबत कॅप्शन म्हणून फिरत असलेला एक मेसेज सुद्धा पाठवला.

‘ न्यू यॉर्कच्या टाईम्स स्केवर वर झळकले राम लल्ला, प्रभू श्रीराम साऱ्या विश्वाचे आहेत, सारं विश्व त्यांचं आहे. मोदी है तो मुमकिन है!’ असे त्यात लिहिलेले आहे.

एका व्हॉट्सऍप ग्रुपवर सुद्धा आम्हाला अशाच प्रकारचा दुसरा फोटो पहायला मिळाला. या फोटोसोबत ‘अमेरिकेत श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन उत्सवाची तयारी’ असे कॅप्शन दिलेय.

ट्विटरवर तर अशा दाव्यांचा आणि टाईम्स स्क्वेअरवर श्रीरामाची प्रतिमा झळकत आहे सांगणाऱ्या ट्विट्सचा जणू पूर आलाय.

Shreeram on Times Square viral tweets

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटोज एकेक करून गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले. त्यानुसार जे जे सत्य समोर आलं ते पुढील प्रमाणे.

एकाच उंच स्क्रीनवर रामाची प्रतिमा असलेला फोटो रिव्हर्स सर्च करून पाहिला तेव्हा तंतोतंत मिळता जुळता दुसरा एक फोटो आमच्या समोर आला. ज्यामध्ये खाली दिसणारी माणसे, शेजारी स्क्रोल होणाऱ्या जाहिराती सर्वकाही सेम होतं.

viral pic vs original pic

अम्र दिआब (Amr Diab) या अरब संगीतकाराचे २०१९ साली हे फोटोज झळकले होते. त्यावेळी ‘अरब न्यूज’ने बातमी सुद्धा केली आहे. १३ नोव्हेंबर २०१९ची बातमी आपण येथे वाचू शकता.

इतर फोटोज रिव्हर्स सर्च करत असताना आम्हाला ‘मेकस्वीट’ नावाची एक वेबसाईट सापडली जिथे मार्केटिंगसाठी उपयुक्त असणाऱ्या डिझाईन्स, थ्री डी लोगोज करता येतात. तसेच इथे टाईम्स स्क्वेअरवर आपण आपली जाहिरात झळकवली तर कशी दिसेल याचं कल्पनाचित्र तयार करता येतं.

या वेबसाईटवरील फिचरचा उपयोग करून कुणीही न्यूयॉर्क मधील ‘टाईम्स स्क्वेअर’च्या भव्य जाहिरात फलकावर आपली जाहिरात केली असा फेक दावा करू शकतो. उदाहरण म्हणून आम्ही ‘चेकपोस्ट मराठी’ टाईम्स स्क्वेअरवर झळकवून दाखवले आहे.

आता पाहुयात व्हायरल दाव्यांतील फोटो आणि ‘मेकस्वीट’ वेबसाईटचा वापर करून आम्ही तयार केलेल्या फोटोमधील तुलना.

viral pic vs pic edited by using feature

व्हायरल फोटोमध्ये टाईम्स स्क्वेअरचा जो मूळ फोटो वापरलाय तो रिव्हर्स करून वापरलाय. त्यामुळे डाव्या गोष्टी उजवीकडे गेल्या आहेत. फार बारकाईने पाहिल्यास जाहिरातींवर असणारे इंग्रजी शब्द उलटे वाचायला मिळतील.

आम्ही त्या वेबसाईट फिचरचा वापर करून बनवलेला फोटो आणि व्हायरल फोटो पाहिल्यास लक्षात येईल बिअरची बॉटल असणारी जाहिरात, कोपऱ्यातील जाहिराती. अगदी कार रस्त्यावर उभ्या असणारी पद्धत तंतोतंत सारखी आहे. बदल एवढाच की एडिटरने जिथे जागा मिळेल तिथे श्रीरामाचे फोटोज लावले आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की व्हायरल फोटोज आणि दावे फेक आहेत. टाईम्स स्क्वेअर वर रामाच्या प्रतिमा झळकणे ही कुणा फोटो एडिटरची कमाल आहे. या व्यतिरिक्त यात तसूभर सुद्धा सत्य नाही.

टाईम्स स्क्वेअरवर ५ ऑगस्ट रोजी श्रीरामाची 3D प्रतिमा ( times square shree ram) झळकवली जाणार आहे. याविषयी बातम्या सुद्धा आल्या होत्या. परंतु त्याया आधीच व्हायरल होणाऱ्या या ईमेजेस फेक आहेत.

हेही वाचा: कपिल सिब्बल यांनी ‘राम मंदिर बनले तर आत्महत्या करेल’ अशी धमकी दिलीच नव्हती!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा