Press "Enter" to skip to content

हाथरसला जाताना राहुल आणि प्रियांका गांधी हसत चालल्याचे सांगणारे व्हायरल फोटो फेक!

उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेतील पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले राहुल आणि प्रियांका गांधी हसत खिदळत चालले होते हे सांगण्यासाठी काही फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होत आहेत. (rahul priyanka laughing)

ट्विटर युजर विकी जैन यांनी सदर फोटो पोस्ट करत ‘हाथरस जाते विपक्ष के नेता, अत्यधिक दुःख चेहरे पर साफ़ दिखाई दे रहा हैं’ असे कॅप्शन दिले आहे.

Advertisement

उजव्या विचारधारेचे न्यूज पोर्टल ‘ऑपइंडिया’ने सुद्धा याविषयी बातमी देताना याच व्हायरल फोटोचा वापर केला आहे. (rahul priyanka laughing)

OP india shared false old pic to show rahul priyanka laughing
Source: Opindia

पडताळणी:

सदर व्हायरल फोटो आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आले की कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून २७ एप्रिल २०१९ रोजी हे फोटोज शेअर झाले आहेत.

म्हणजेच हाथरस घटनेच्या जवळपास दीड वर्षे आधीचे हे फोटोज आहेत.

ऑप इंडियाने बातमीमध्ये ANI या वृत्तसंस्थेचे ट्विट शेअर केले आहे. त्यामध्ये प्रियांका आणि राहुल गांधी हाथरसच्या दिशेने कारमध्ये चालले आहेत. प्रियांका गांधी कार चालवत आहेत. या व्हिडिओमध्ये काही सेकंदानंतर हसण्याचा आवाज येतोय.

हा व्हिडीओ आम्ही बऱ्याचदा ऐकून पाहिला परंतु मागच्या बाजूने कॅमेरा असल्याने आणि चेहऱ्यांवर मास्क असल्याने यातील हसण्याचा आवाज नेमका राहुल-प्रियांका यांचा आहे की मागे बसलेल्या लोकांचा आहे हे लक्षात येणे कठीण जात आहे त्यामुळे याबद्दल ठोस काही विधान करणे उचित ठरणार नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये सापडलेल्या व्हिडीओतून हे स्पष्ट होत नाहीये की व्हिडीओमध्ये (rahul priyanka laughing) राहुल आणि प्रियांका गांधी हाथरसच्या दिशेने रवाना होत असताना एकमेकांशी हसत आहेत, परंतु व्हायरल फोटो ज्यामध्ये ते स्पष्टपणे हसताना दिसत आहेत ते फोटोज आताचे नसून जवळपास दीड वर्षाचे आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्रात ४७ ‘हाथरस’ म्हणत उद्धव ठाकरेंना ट्रोल करणाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा