“जागो हिन्दू जागो, हिन्दू जगेगा देश जगेगा, देश बचेगा!” या अशा आवाहनासह हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विविध सोशल मिडिया ग्रुप्स आणि अकाउंट्सवरून एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत दोन भव्य पर्वतांच्यामध्ये शिवलिंग (adbhut shivling) असल्याचे दिसत आहे.
फोटो पोस्ट करत जे कॅप्शन दिले आहे ते सर्व ग्रुप्समध्ये तंतोतंत कॉपी-पेस्ट आहे.
‘#ओम्_शिवा— #अद्भुत,#अकल्पनीय।
।।आरम्भ भी अंत भी,शांत भी प्रचंड भी ।।
दक्षिणी भारत में दो पहाड़ो के बीच स्थित शिवलिंग,देखो सनातनियों हमारे पूर्वजों ने कितनी मेहनत व कितनी अद्भुत महान वास्तुकला का हमे परिचय करवाया और विरासत में हमारे लिए इतने अद्भुत अजूबे हमारे लिए छोड़कर गए है।
हमारा दुर्भाग्य ये रहा कि हमारे इतिहास के खिलाफ राजनीतिक षड्यंत्र रचे गए और इतिहास लेखन का कार्य #वामपंथियों को दिया गया और इन सब चीजों को उन्होंने सिर्फ दफन करने का कार्य किया है,
आज इनको हमे हर व्यक्ति तक पहुचाने की आवश्यकता है, और इनको संर क्षण दिलवाना हमारा कर्तव्य है।
जागो हिन्दू जागो हिन्दू जगेगा देश जगेगा देश बचेगा।’
फेसबुकवर हिन्दू युवा वाहिनी -भारत -दिल्ली प्रदेश, अखंड भारत हिंदू राष्ट्र, श्री राम नाम प्रचार मंडल, I Love MODI JI, भारत की बात आणि स्वयंसेवकांनी चालवलेल्या RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांसारख्या अनेक ग्रुप्सवर हा फोटो याच कॅप्शनसह पोस्ट केला गेला आहे.
ट्विटर युजर्ससुद्धा या ईमेजला अशाच काही कॅप्शनसह ट्विट करत आहेत.
सदर व्हायरल इमेज ‘चेकपोस्ट मराठी’च्या वाचक पुजा अवसरमोल यांनी निदर्शनास आणून दिली.
पडताळणी:
व्हायरल पोस्टमधील इमेज आम्ही रिव्हर्स सर्च करून पाहिली असता काही फोटोज समोर आले त्यामध्ये अगदी असेच दोन भव्य दगडांच्यामध्ये अडकलेला दुसरा तुलनेने छोटा दगड अडकल्याचे दिसत होते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही त्यावर क्लिक केले असता सत्य समोर आले.
सदर दृश्य हे नॉर्वेमधील मॅजेस्टीक हँगिंग स्टोनचे आहे. अमोंग्राफ वेबसाईटवर नॉर्वेमधील १५ आकर्षक दृश्यांची माहिती दिली आहे. त्यातील हे सर्वात पहिले दृश्य आहे.
याविषयी खात्री करण्यासाठी आम्ही गुगल मॅपवर सर्च केलं असता तिथेही हाच फोटो असल्याचे दिसले. त्यावर अर्थातच शिवलिंग नव्हते.
याच लिंकवर काही पर्यटकांनी तेथे जाऊन काढलेले फोटो पोस्ट केल्याचे दिसले.
व्हायरल इमेज ही एडीटेड असून मूळ फोटोमध्ये शिवलिंग टाकले असल्याचे स्पष्ट होत आहे. ते समजून घेण्यासाठी आपण खालील इमेज पाहू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हिंदुत्ववादी विचारधारेच्या ग्रुप्सद्वारे व्हायरल होत असणारी शिवलिंगाची (adbhut shivling) इमेज एडीटेड असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दृश्य दक्षिण भारतातील नसून नॉर्वे मधील मॅजेस्टीक हँगिंग स्टोनचे असल्याचे सिद्ध झाले.
हेही वाचा: युवकाला बुटाने पाणी पाजणाऱ्या व्हिडीओला जातीवादाचे लेबल! वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
[…] दोन पर्वतांच्या मध्ये अडकलेल्या शिळे…? […]