Press "Enter" to skip to content

कॉंग्रेसजन इंदिरा गांधींचा लेह मधील फोटो गलवान व्हॅलीचा म्हणून फिरवताहेत !

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा भारतीय सैन्याला संबोधित करत असतानाचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. सोशल मिडीयावर दावा करण्यात येतोय की तो फोटो लडाखमधील गलवान व्हॅलीमधला आहे.   

इंदिरा गांधींच्या फॅन फॉलोअर्सकडून चालविण्यात येत असलेल्या ‘इंदिरा गांधी’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘सैन्यदलाच्या जवानांना संबोधित करताना इंदिरा गांधी गलवान व्हॅली, लडाख’ असा उल्लेख आहे.

हा फोटो आतापर्यंत १९ हजार युजर्सनी लाईक केलाय आणि जवळपास ४२०० युजर्सनी रिट्वीट केलाय. रिट्वीट करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांचा देखील समावेश आहे.

Advertisement

‘युथ काँग्रेस’ आणि ‘उत्तर प्रदेश काँग्रेस’ यांसारख्या ब्लू टिक धारक व्हेरीफाईड अकाऊंटवरून देखील हाच फोटो पोस्ट करण्यात आलाय. सगळीकडचा दावा देखील तोच.

‘युथ काँग्रेस’च्या हँडलवरून ट्वीट करण्यात आलेला फोटो जवळपास १००० युजर्सनी रिट्वीट केलाय, तर ‘उत्तर प्रदेश काँग्रेस’च्या हँडलवरचा फोटो २२०० युजर्सनी रिट्वीट केलाय.

‘इंडियन युथ काँग्रेस’ या फेसबुक पेजवरून देखील हा फोटो शेअर पोस्ट करण्यात आलाय. ही पोस्ट ५५० युजर्सनी शेअर केलीये.

Former PM Indira Gandhi addressing Army jawans .While one roared another cowered.

Posted by Indian Youth Congress on Sunday, 21 June 2020

‘उत्तर प्रदेश पूर्व युवक काँग्रेस’च्या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टला देखील २९२ शेअर मिळालेत.

इंदिरा गांधी जी लेह में सैनिकों के साथ।

Posted by U.P East Youth Congress on Sunday, 21 June 2020

पडताळणी

‘चेकपोस्ट मराठी’ने गुगल रिव्हर्स इमेजच्या सहाय्याने या फोटोची पडताळणी सुरु केली, त्यावेळी आम्हाला इनफीड या वेबसाईटवर Standing At Galwan Valley when Indira Gandhi shocked the Chinese’ या हेडलाईनसह एक लेख मिळाला.

लेखाचा फिचर फोटो म्हणून इंटरनेटवर व्हायरल होत असलेला इंदिरा गांधी यांचा फोटोच वापरण्यात आलेला आहे. परंतु या लेखासोबत प्रॉब्लेम असाय की हा लेख संबंधित वेबसाईटवर २२ जून २०२० म्हणजेच कालच फोटो व्हायरल व्हायला लागल्यानंतर अपलोड करण्यात आलाय.

शिवाय लेखाची आणि त्यातील माहितीची जबाबदारी घेण्याची देखील कुणाचीच तयारी नाही. लेखासोबत लेखकाचे नाव नसून ‘विशेष प्रतिनिधी’ने हा लेख अपलोड केलेला आहे. साहजिकच शंकेला बराच वाव आहे आणि लेखाची कसलीही विश्वासार्हता नाही.

त्यानंतर आम्हाला आर्टशिप या वेबसाईटवर २७ नोव्हेंबर २०१४ रोजी प्रकाशित लेख सापडला ‘On This Day: 19 January 1966- Indira Gandhi takes charge in India’ या हेडलाईनसह प्रकाशित लेखात इंदिरा गांधींच्या कारकीर्दीवर टाकण्यात आलेला आढावा वाचण्यास मिळाला.

शिवाय याच लेखात इंदिरा गांधींचा व्हायरल होत असलेला तो फोटो देखील मिळाला. फोटोच्या कॅप्शननुसार माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा सैन्याला संबोधत असतानाचा हा फोटो १९७१ सालचा असून लेह येथील आहे. 

Former PM Indira Gandhi addressing Jawan in Leh in 1971
Source: Art-Sheep

आमच्या संशोधनात आम्हाला व्हायरल दावा नाकारत फोटो लेह येथील असून फोटोचा सोर्स पीटीआय असल्याचं सांगणारं रचित शेठ यांचं ट्वीट सापडलं.

रचित सेठ यांनी दिलेली माहिती पडताळून बघण्यासाठी आम्ही पीटीआय या न्यूज एजन्सीच्या वेबसाईटवर ‘Indira Gandhi’ या कीवर्डसह सर्च केल्यानंतर तिथे देखील आम्हाला हा फोटो मिळाला. पीटीआयच्या वेबसाईटवरील माहितीनुसार देखील हा फोटो १९७१ सालचा असून लेह येथीलच आहे.

PTI website screenshot
Source: PTI

वस्तुस्थिती

चेकपोस्ट मराठीच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला इंदिरा गांधी यांचा फोटो गलवान व्हॅलीमधला नसून लेह येथील आहे. अनेक काँग्रेस नेते आणि काँग्रेसशी संबंधित संघटना यांच्याकडून हा फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.

हेही वाचा: ऍसिड ऍटॅक पीडितांना मॉडेल्स समजून उडवली जातेय अमृता फडणवीसांच्या दानधर्माची खिल्ली

 

 

 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा