सोशल मीडियावर एका बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. दावा केला जातोय की भारतीय रेल्वेकडून रेल्वे प्रवासाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून आता रेल्वे प्रवासासाठी 1 वर्षाच्या मुलाचे देखील पूर्ण तिकीट काढावे लागेल.
पडताळणी:
भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या रेल्वे प्रवासासाठी वेगळे तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. जर एखाद्या प्रवाशाला 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी स्वतंत्र सीट हवे असेल, तर त्यासाठी मात्र त्याला पूर्ण तिकीट काढावे लागेल.
पडताळणी दरम्यान आम्हाला केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेले एक ट्विट देखील बघायला मिळाले. ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की लहान मुलांसाठी पूर्ण तिकीटासंदर्भातील दावे चुकीचे आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र सीट हवी असल्यासच वेगळे तिकीट घ्यायला लागेल. जर सीट बुक करायची नसेल तर 5 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवास करता येईल.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल बातमी चुकीची आहे. रेल्वेने 5 वर्षांखालील मुलांचे तिकीट काढणे बंधनकारक केलेले नसून केवळ लहान मुलांसाठी स्वतंत्र्य सीट हवी असल्यासच त्यांचे पूर्ण तिकीट काढावे लागेल.
हेही वाचा- नासाच्या वैज्ञानिकाने कुटुंबासह स्वीकारला हिंदू धर्म? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment