Press "Enter" to skip to content

वाढत्या GST चे खापर मोदींवर फुटू नये म्हणून व्हायरल होतायेत फेक दावे! वाचा सत्य!

वाढत्या GST च्या जाचामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) टीकेचे लक्ष्य बनवले जात आहे; परंतु यात त्यांचा काहीएक संबंध नसून हा राज्यांच्या वित्तमंत्र्यांचा आणि GST कौन्सिलचे चेअरमन असलेल्या अमित मित्रा (Amit Mitra) यांचा निर्णय आहे. मित्रा हे मोदी द्वेष्टे असून पश्चिम बंगालचे वित्त मंत्री व तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत. अशा प्रकारचे दावे सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

Advertisement

व्हायरल मेसेज:

…. आणि मोदीना नावे ठेवली जातातगेले काही दिवस विद्वान व्यक्तींनी GST चे दर वाढवले म्हणून मोदींवर टीका करायला सूरवात केली आहे ….याचा अर्थ त्याना GST चे दर ठरवणाऱ्या GST कौन्सिल बद्दल काहीच माहिती नाहीGST कौन्सिल मधे 33 मेंबर्स असतात 2 प्रतिनिधी केंद्र सरकारचे31 राज्यांचे 31 वित्त मंत्री यंदा कौन्सिलचे चेअर मन आहेत …..मोदी द्वेष्टे अमित मित्रा (तृणमूल काँग्रेसचे प.बंगाल चे वित्तमंत्री)आता सांगा बहुमताने चुकीचे निर्णय घेतले जात असतील तर त्याला केंद्र सरकारचे 2 प्रतिनिधी जबाबदार का 31 राज्यांचे प्रतिनिधी जबाबदार?राज्यांना जास्त पैसे हवेत म्हणून 31 राज्यांचे वित्तमंत्री संगनमत करून GST चे दर वाढवतात आणि अंधद्वेष्टे, फक्त केंद्र सरकारला, मोदीना शिव्या देतात. (स्वतः च्या राज्याच्या वित्तमंत्र्याला नावे ठेवत नाहीत?)थोडक्यात, राज्यसरकार GST चा दर वाढवत असते, केंद्र सरकार नाही…. द्वेश्ट्यांनो….. GST बद्दल टीका करायच्या आधी या वेबसाईटला भेट द्या…. माहिती करून घ्या आणि मग ठरवा कुणाला शिव्या द्यायच्या ते.

Source: Facebook

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप अशा सर्वच माध्यमांतून हे दावे व्हायरल होताना दिसतायेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संदेश बालगुडे यांनी पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल मेसेजची पडताळणी करण्यासाठी भारत सरकारच्या GST कौन्सिल अधिकृत वेबसाईटला भेट दिली. त्यावर ३३ सभासदांची नावे असणारी यादी आहे. यापैकी केंद्रातील २ मंत्री आणि ३१ राज्यांचे प्रतिनिधी असल्याची व्हायरल मेसेज मधील माहिती खरीच आहे, परंतु कौन्सिलचे चेअरमन म्हणून अमित मित्रा असल्याचे त्या मेसेजमध्ये लिहिलेय, ते नाव सदर सभासदांच्या यादीत कुठेही दिसत नाही.

कौन्सिल चेअरमन केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या आहेत. इतर सभासद राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपमुख्यमंत्री अथवा अर्थमंत्री आहेत. पश्चिम बंगालचे प्रतिनिधी म्हणून अमित मित्रा नसून चंद्रिमा भट्टाचार्य आहेत. ३१ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रतिनिधींमध्ये बहुतांश प्रतिनिधी भाजपचे आहेत कारण तब्बल १२ राज्यांत भाजपचे एकहाती राज्य आहे.

GST council member list
Source: GST Council website

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की GST कौन्सिलचे चेअरमन अमित मित्रा असल्याचे व्हायरल दावे फेक आहेत. कौन्सिलचे चेअरमन केंद्रीय अर्थमंत्री असतात. या पूर्वी अरुण जेटली होते. आता निर्मला सीतारामन आहेत. तसेच इतर सभासदांतही भाजप नेत्यांचा आकडा अधिक आहे.

हेही वाचा: पद्मश्री विजेत्या कवीकडे पुरस्कार घ्यायला दिल्लीला जाण्यासाठी नव्हते पैसे? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा