Press "Enter" to skip to content

‘केंद्र सरकार दरमहा ३५०० रुपये बेरोजगार भत्ता देणार, रजिस्ट्रेशन करा’ लिहिलेले मेसेज फेक!

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सऍपवर एका रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक फिरत आहे. यामध्ये ‘पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजने’द्वारे दरमहा ३५०० रुपये घरबसल्या मिळणार असल्याची माहिती दिलीय. (Pantapradhan Berojgar Yojna)

Advertisement
Source: Facebook

हेच मेसेज 2020-21 मध्येही व्हायरल होत होते.

प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021 के लिए प्री-रजिस्ट्रेशन हो रहा है, इस योजना के अंतर्गत सभी युवा बेरोजगारों को 3500 रुपये हर महीने दिया जाएगा प्री-रजिस्ट्रेशन करने के लिए निचे दिए गए लिंक पर क्लिक कर अपना फॉर्म भरे

या अशा मजकुरासोबत रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंकसुद्धा जोडलेली आहे.

Berojgar bhatta viral msg
Source: Whatsapp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास हा व्हायरल मेसेज आल्यानंतर पडताळणीस सुरुवात झाली.

व्हायरल मेसेजमधील वेबसाईटच्या लिंकमध्ये ‘ब्लॉगस्पॉट’ असे लिहिलेले आहे. म्हणजेच ही ब्लॉग वेबसाईट फुकटात चालू केलेली आहे. शासकीय अधिकृत वेबसाईट कधीही ब्लॉगस्पॉटवर नसतात.

शासकीय वेबसाईटच्या शेवटी .com नसते तर .gov असे असते.

Homepage PM berojgar yojna fake site

अशी कुठली योजना अस्तित्वातच नाही:

(Pantapradhan Berojgar Yojna) या योजनेसंदर्भात आम्ही विविध कीवर्ड्स वापरून सर्च केले तेव्हा शासनातर्फे अधिकृत बातमी देणाऱ्या Press Information Bureau (PIB) चे ४ मे २०२०चे ट्विट आम्हाला सापडले.

यात व्हायरल मेसेज मधील ब्लॉग फेक असल्याचे सांगितले असून, अशी कुठलीही योजना अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये ‘पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना’ (Pantapradhan Berojgar Yojna) म्हणत व्हायरल होणारे मेसेज फेक असल्याचे निष्पन्न झाले. सरकारदरबारी असली कुठलीच योजना अस्तित्वात नाहीये.

खाजगी ब्लॉगलिंकवर घेऊन जाणारी ती लिंक बनवणाऱ्या लोकांचे उद्देश काही भलतेच आहेत, अशा कुठल्याही आर्थिक फायदा सांगणाऱ्या लिंक्स ओपन करताना किंवा त्यावर खाजगी माहिती भरताना सतर्क राहण्यातच शहाणपण आहे.

हेही वाचा: ‘नंबर 140 चा कॉल उचलू नका’ फेक मेसेजमध्ये ‘सोनी लिव्ह’च्या प्रोमोशनची भर!

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा