सध्या सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेलं ऑफिशियल पत्र. (modi letter to yogi)
हिंदू राष्ट्रासाठी तसंच आयोध्येतील राम मंदिरासाठी योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी पत्रातून अभिनंदन केलं आहे.
पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांना २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि शेवटी मंदिराच्या उभारणीसाठी ५० कोटीचा निधी पंतप्रधान कार्यालयातून पाठवत असल्याचंही त्यात सांगितलंय. (modi letter to yogi)
सदर पत्र व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अंबादास जरारे यांनी निदर्शनास आणून दिले.
पडताळणी :
‘चेकपोस्ट मराठी’ने हे पत्र खरंच पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवलं आहे का हे तपासण्यासाठी शोधाशोध सुरू केली.
गूगलवर त्या संबंधीचे keywords टाकून सर्च करून पाहिलं त्यावेळी लक्षात आलं की अशाच प्रकारचं अजून एक पत्र व्हायरल झालं होतं. आणि हे पत्र मोदींनी माजी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांना पाठवलं होतं. त्या पत्रात मोदींनी अयोध्येतील राम मंदिराच्या निकालाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं होतं.
त्याच पत्रात न्या. ए.एस. बोबडे , न्या. डी.वाय चंद्रचूड , न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचं सुद्धा अभिनंदन करण्यात आलं होतं. अजून थोडा तपास केल्यानंतर असं समजलं की हे पत्र बांग्लादेशच्या माध्यमांमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
त्यानंतर विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करून यासंबंधी भारत सरकारचा आक्षेप नोंदविला. यावर बांगलादेशच्या इंडियन हाय कमिशनने प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट केलं की ते पत्र फेक असून अशा प्रकारच कुठलंही पत्र मोदी यांनी लिहलेलं नाहीये.
रंजन गोगोई यांना लिहलेलं पत्र आणि योगी आदित्यनाथ यांना लिहलेल्या पत्रात नावं सोडले तर बाकीचा मजकूर बऱ्यापैकी सारखाच दिसला. गोगोई यांना लिहलेलं पत्र कुठल्या मुद्यांवरून फेक ठरलं हे तपासायला ‘चेकपोस्ट मराठी’ने सुरुवात केली. तेव्हा काही ठळक मुद्दे समोर आले जे योगी आदित्यनाथ यांच्या पत्रास सुद्धा लागू होत आहेत.
पत्राच्या कागदाचं टेक्स्चर:
प्रधानमंत्री मोदींचं नेमकं कसं असतं, ते मूळ पत्र पाहण्यासाठी आम्हाला क्रिकेटपटू गौतम गंभीरला मोदींनी पाठवलेल्या पत्राची मदत मिळाली. गंभीर यांनी १६ डिसेंबर २०१८ रोजी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून पंतप्रधानांनी त्यांना लिहिलेलं पत्र पोस्ट केलं आहे. त्या पत्राचा कागद आणि टेक्स्चर वेगळं असल्याचं दिसलं.
सहीमध्ये फरक:
दुसरी आणि महत्वाची गोष्ट अशी की दोन्ही पत्रात मोदींची सही वेगळी आहे. ‘N’ लिहिताना फेक पत्रात सलग लिहिलाय. परंतु मूळ सहीमध्ये त्यात हलकीशी जागा सोडलेली आहे. (modi letter to yogi)
या सर्वाला PIBने अधिकृत दुजोरा दिलाय आणि हे व्हायरल पत्र फेक असल्याचं स्पष्ट केलंय.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’ने केलेल्या पडताळणीत हे सिद्ध झालं की व्हायरल होणारं पत्र हे खरं नसून फेक आहे. अशा कुठल्याही प्रकारचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवलं नव्हतं.
हेही वाचा: कपिल सिब्बल यांनी ‘राम मंदिर बनले तर आत्महत्या करेल’ अशी धमकी दिलीच नव्हती!
[…] […]