Press "Enter" to skip to content

इटली सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणण्यासाठी धाडली चक्क ‘टॅक्सी’? वाचा सत्य!

‘प्रेसिडेंट बिडेन ८५ गाड्यांच्या ताफ्यासह रोममध्ये दाखल तर मोदींना रिसीव्ह करण्यासाठी रोमने धाडली टॅक्सी..!!’ अशा दाव्यांसह काही मिम्स सोशल मीडियात व्हायरल होतायेत. मोदी (Narendra Modi) ज्या कार मधून उतरत आहेत त्या कारवर टॅक्सी (Taxi) असे लिहिलेला पिवळा बॉक्स आणि मागच्या नंबर प्लेट खाली इटलीतील टॅक्सी सर्व्हिसची पाटी असलेले फोटो शेअर केले जातायेत.

Advertisement
Italy sent Taxi to receive modi memes on Facebook
Source: Facebook

ट्विटर आणि फेसबुकवर फिरणारे हे फोटोज व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सागर पोवार यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांसह फिरणारे फोटो पाहिले असता प्रामुख्याने उजव्या कोपऱ्याला ANI चा लोगो असणाऱ्या इमेजेस आम्हाला आढळल्या. या वृत्तसंस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आम्ही शोधाशोध केली. तेव्हा असे लक्षात आले की नरेंद्र मोदी इटलीची राजधानी असलेल्या रोम येथे G20 समीटकरिता गेले आहेत. त्यावेळी ते ‘व्हॅटिकन सिटी’मध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी गेले असतानाची ही दृश्ये आहेत.

कारचा मागच्या बाजूने असणारा फोटो पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिंस यांच्या भेटीसाठी दाखल झाले तेव्हाच्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट आहे. व्हिडीओच्या ३६ व्या सेकंदाला आपणास मोदी गाडीतून उतरताना दिसतात. यामध्ये मागच्या नंबरप्लेटखाली कुठेही इटलीच्या टॅक्सी सर्व्हिसचे नाव पाहण्यास मिळत नाहीये.

Source: Youtube/ANI

दुसरा फोटो पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) तेथून निघतानाच्या व्हिडीओतील आहे. त्यात देखील एकाही गाडीवर आपणास ‘Taxi’ असे लिहिलेले प्लास्टिक बॉक्स दिसत नाहीत.

Source: Youtube/ANI

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावे फेक असल्याचे निष्पन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) प्रवासाकरिता इटलीने ‘टॅक्सी’ दिल्याचे दावे करत व्हायरल होत असलेल्या इमेजेस एडीटेड आहेत. खऱ्या फोटोज-व्हिडीओज मध्ये कुठेही ‘Taxi’ सर्व्हिसचा लोगो किंवा कंपनीचे नाव कार वर दिसत नाही.

हेही वाचा: सुप्रीम कोर्टाने खासदार आमदारांच्या पेन्शन बंद करण्याचा निकाल सुनावला?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

  1. सचिन सचिन October 31, 2021

    Voxvagan punto ( hatch back car) is equal to taxi for PM of any country ,
    my friend ,
    एवढ्या मोठ्या इटली मध्ये मोठ्या गाड्या नव्हत्या का ?
    आपल्याला आरसा दाखवला

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा