Press "Enter" to skip to content

नेपाळच्या पशुपतीनाथ शिवलिंगाचा दुर्मिळ फोटो म्हणत व्हायरल होतायेत भलत्याच इमेज!

सोशल मीडियावर कुठल्याही, कसल्याही दाव्यांना अंकुश नाही. त्यात जर देव-देश-धर्म याबद्दल काही असेल तर तिथे कुणी चिकित्सक वृत्तीने पहात नाही. जे येईल ते मनोभावे फॉरवर्ड केलं जातं. यावेळी फॉरवर्डमध्ये आहे ‘काठमांडूचे पशुपतीनाथ शिवलिंग’. (Pashupatinath Shivling Kathmandu)

Advertisement

असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. सोबतच्या टेक्स्ट मध्ये असं लिहिलंय की,

“ये फोटो श्री पशुपतीनाथजी काठमांडू का है. जो की नेपाल में हैं, इस शिवलिंग का फोटो बहुत मुश्किल से उपलब्ध हुआ है , आप इसे अपने मित्रो को भी भेजे ताकी वो भी दर्शन का लाभ ले सके. पहले शेअर करे फिर चमत्कार देखे “.

Source: whatsapp

सदर व्हायरल इमेजबद्दल ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण सागर यांनी पडताळणीसाठी विनंती केलीय.

पडताळणी :

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गूगलवर ‘रिव्हर्स सर्च’ करून पाहिला तेव्हा अशाच प्रकारचा मजकूर लिहून वेगवेगळ्या शिवलिंगाचे फोटो पशुपतीनाथाचे असल्याचे सांगत व्हायरल होत असल्याचं निदर्शनास आलं.

पशुपतीनाथ शिवलिंगाचे स्वरूप नेमके कसे?

आम्ही ‘Pashupatinath Shivling Kathmandu’ या किवर्ड्सच्या सहाय्याने सर्च केलं तेव्हा दोन वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग असणारे फोटोज आमच्या समोर आले.

दोन्हींबद्दल पुन्हा सर्च केल्यानंतर समजलं की एक आहे मंदसौर मध्यप्रदेशातील पशुपतीनाथ मंदिरातील तर दुसरी आहे काठमांडू नेपाळ पशुपतीनाथमधील शिवलिंग.

१. अष्टमुखी पशुपतीनाथ शिवलिंग:

आठ चेहरे असणारं शिवलिंग म्हणून अष्टमुखी. याच शिवलिंगाचा फोटो नेपाळच्या पशुपतीनाथाचा म्हणून इंटरनेटवर अनेकांनी शेअर केलाय. अगदी दैनिक जागरण सारख्या राष्ट्रीय माध्यमानेसुद्धा.

Source: Jagran

आम्ही अजून खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा आम्हाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या शिवलिंगाची पूजा करत असतानाची बातमी मिळाली. ज्याचे स्थळ आहे मंदसौर, मध्यप्रदेश.

Source: Youtube

२. पशुपतीनाथ शिवलिंग, काठमांडू:

या व्यतिरिक्त काही ठिकाणी आम्हाला दुसरी एक शिवलिंग असलेली इमेज मिळाली. त्याची पडताळणी करताना बराच द्राविडी प्राणायम करावा लागला कारण मंदिराच्या गाभाऱ्यात कॅमेऱ्यास परवानगी नाहीये. या (Pashupatinath Shivling Kathmandu) शिवलिंगाचे फारसे फोटोज उपलब्ध नाहीत.

तरीही अलामी आणि गेट्टी ईमेज या अधिकृत सोर्सद्वारे मिळालेली ईमेज आणि शेमारु कम्पनीने काठमांडूच्या पशुपतीनाथ तीर्थस्थळावर बनवलेल्या महितीपटातील ईमेज तंतोतंत जुळताहेत.

source: youtube credit: Shemaroo

‘ओह फॅक्ट्स’ या साईटवर पशुपतीनाथ मंदिराचे १० फॅक्ट सांगितले आहे. त्यात शिवलिंगाबद्दल माहिती देताना त्यांनीही अशाच शिवलिंगाचा फोटो वापरलाय. (तरीही याबद्दल आम्ही काहीसे साशंक आहोत कारण अनेक ठिकाणी पशुपतीनाथ शिवलिंग चतुर्मुखी असल्याचा उल्लेख आहे. अधिकृत माहितीसाठी पशुपती मंदिराच्या विश्वस्थांशी संपर्क साधत आहोत.)

अधिकची माहिती:

शेमारूच्या माहितीपटानुसार हिंदू धर्मात ज्या १२ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे. त्यात १२ मध्ये केदारनाथ आणि हे काठमांडूचे पशुपतीनाथ मिळून एक ज्योतिर्लिंग गृहीत धरले जाते. म्हणजेच १२ पैकी अर्धे आणि एकमेव ज्योतिर्लिंग जे भारताबाहेर आहे, ते म्हणजे पशुपतीनाथ.

येथे हिंदू धर्मियांव्यतिरिक्त इतरांना मंदिरात प्रवेश नाही. विदेशी पर्यटक आणि ईतर धर्मियांसाठी बाहेर वेगळी जागा आहे जेथून ते दुरूनच मंदिर पाहू शकतात.

हिंदू आणि बौद्ध स्थापत्यशैलीला एकत्र करत या मंदिराच्या अंतरंगाची रचना आहे. बाहेरून ते पॅगोडा शैलीचे आहे.

Kathmandu,nepal,asia,temple,unesco - free image from needpix.com

वस्तुस्थिती :

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झालं की काठमांडू, नेपाळ येथील पशुपतीनाथ शिवलिंगाचा म्हणत जे फोटोज व्हायरल होतायेत ते खरे नाहीत.

इतरत्र कुठल्या मंदिरात किंवा कलाकुसरीच्या दालनात ठेवलेले ते शिवलिंग आहेत. त्यांचा पशुपतीनाथ काठमांडू, नेपाळ सोबत काहीही संबंध नाही.

हेही वाचा: ‘अयोध्येतील राम मंदिराचे थ्री डी मॉडेल’ म्हणत शेअर होतोय जैन मंदिराचा व्हिडीओ!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा