Press "Enter" to skip to content

देश स्वातंत्र्यासाठी लढत असताना संघाचे लोक इंग्लंडच्या राणीला सलामी ठोकत होते?

सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक एका रांगेत उभे आहेत आणि समोर इंग्लंडची राणी एलिझाबेथ (Britain queen Elizabeth) चालतेय. दावा केला जातोय की जे लोक स्वातंत्र्यपूर्व काळात राणीला सलामी देत होते ते आता स्वतःला देशभक्त म्हणवून घेतायेत.

Advertisement

‘ब्रिटेन माता की जय. यह फोटो बडी मुश्कीलसे हाथ लगा है. हर फोन तक पहुचना चाहिये. सब को पता चले देश का गद्दार कौन है.

जब पुरा देश अंग्रेजोंसे लड रहा था, तब कुछ गद्दार इंग्लैंड की रानी को सलामी दे रहे थे. सुना है इनके वंशज खुद को देशभक्त समजते है.

अशा कॅप्शनसह तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’च्या वाचिका अमृता खंडेराव यांनी सत्यतेच्या पडताळणीची विनंती केली.

claim of RSS volunteers saluting Britain queen Elizabeth viral post_ Check post Marathi fact check
Source: Facebook

पडताळणी:

  • ‘चेकपोस्ट मराठी’ला व्हायरल दाव्याची पडताळणी करताना असे लक्षात आले की सदर इमेज आणि त्यासोबतचे दावे २०१६ सालापासून व्हायरल होत आहेत.
  • गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्या नंतर २ वेगवेगळे फोटोज आमच्यासमोर आले. या दोन्हींचा एकमेकांशी काहीएक संबंध नसल्याचे दिसले.
Source: The Times of India
  • दुसरा फोटो (Britain queen Elizabeth) राणी एलिझाबेथ-II ने नायजेरियन सैन्यात असणाऱ्या ‘रॉयल वेस्ट आफ्रिकन फ्रंटियर’ या बटालियनला नायजेरियात जाऊन १९६५ साली भेट दिली होती, तेव्हाचा आहे. ‘HistoryVille’ वेबसाईटने हा फोटो ट्विट केला होता.
Queen Elizabeth 2 visited Nigerian army in 1965_ Check post Marathi fact
Source: HistoryVille

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल इमेज आणि त्यासोबतचे दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. त्या इमेजमध्ये इंग्लंडची राणी आणि रा.स्व.संघाचे स्वयंसेवक (RSS & Britain queen Elizabeth) समोरासमोर आणण्यासाठी दोन वेगवेगळे फोटोज एकत्र करून ‘ब्लॅक अँड व्हाईट’ इफेक्ट दिला गेलाय जेणेकरून फोटो जुना आणि दुर्मिळ वाटावा.

अशाच प्रकारचे व्हायरल दावे, इमेजेस आपल्या निदर्शनास आल्यास ‘चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या व्हॉट्सऍप क्रमांकावर मेसेज करून सत्यता पडताळून घेऊ शकता.

हेही वाचा: मोदींच्या ‘एनिमी प्रॉपर्टी कायद्या’मुळे सोनिया गांधी आणि राजा महमुदाबादचा डाव फसला?

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा