Press "Enter" to skip to content

मुंबईत एकाच इमारतीत १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे सांगणारी ईमेज फेक!

चीन मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजवर सोशल मीडियात अनेक चुकीच्या, फसव्या, खोट्या दाव्यांना उत आलाय.

भारतात तो दाखल झाला तेव्हाही कोरोना विषाणू पासून होणाऱ्या कोव्हीड१९ आजाराबद्दल अनेकांचे समज गैरसमज होते. त्यातून वेगवेगळ्या भीतीदायक माहितीचा कळत नकळत जनतेकडून प्रसार झाला. अशाच सततच्या अफवांना ‘चेकपोस्ट मराठी’ आपल्या परीने पडताळणी करून खरे होते सांगत आहेच.

Advertisement

अशीच एक अफवा गेल्या काही दिवसांपासून एका इमेजच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याचं आमच्या वाचकांनी ‘चेकपोस्ट मराठी’च्या ‘९१७२०११४८०’ या अधिकृत व्हॉट्सऍप नंबरवर स्क्रिनशॉट पाठवून कळवली.

काय आहे व्हायरल ईमेज?

एका मोठ्या सोसायटीच्या गेटसमोर काही गाड्या उभ्या आहेत आणि आसपास पीपीई कीट घातलेले चाळीसएक कर्मचारी दिसत आहेत. या फोटोच्या खाली मजकूर आहे ‘मालाड लिंक रोड ओमकार अल्टा मोंटे इमारतीमध्ये १६९ केसेस आढळल्या. त्यांनी नुकतंच घरातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परवानगी द्यायला सुरुवात केली होती.’

viral image saying 169 covid19 patients in single building
source: whatsapp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करण्यास सुरुवात केली तेव्हा सर्चअंती ‘बृहन्मुंबई महानगरपालिके’च्या अधिकृत ट्विटर हँडलवर वरील दाव्याविषयी खुलासा करणारे ट्विट मिळाले.

ट्विटमध्ये महानगरपालिका म्हणतेय ‘मालाड (पूर्व) मधील ओमकार अल्टा माँटे येथे १६९ कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती समाज माध्यमांमधून छायाचित्रांसह पसरवली जात आहे. आम्ही खुलासा करु इच्छितो की, सदर बातमी चुकीची असून हे छायाचित्र तेथे आयोजित तपासणी शिबीर (स्क्रिनिंग कॅम्प) चे आहे. नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये.’

ट्विटरवरच जेव्हा आम्ही ‘Alta Monte Screening’ या कीवर्ड्सच्या आधारे सर्च केलं तेव्हा आम्हाला आणखी एक ट्विट सापडलं ज्यामध्ये त्याच अल्टा मोंटे सोसायटीमध्ये राहणाऱ्या ‘लीया’ यांनी २७ जून रोजी ट्विट करून तपासणी बाबतची माहिती दिली आहे.

यामध्ये त्यांनी महानगरपालिकेचे आभार मानत त्यांच्या सोसायटीमध्ये स्क्रीनिंग म्हणजेच तपासणी झाल्याची माहिती दिलीय. पुढे त्यांनी आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडल्सला टॅग करत शासनाच्या कामाचे कौतुक केले आहे आणि सोबत एक फोटो सुद्धा जोडला आहे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे समोर आले की व्हायरल ईमेजमध्ये वापरण्यात आलेला फोटो बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालाडच्या ‘ओमकार अल्ट मोंटे’ इमारतीमध्ये तपासणी शिबीर आयोजित केले होते त्यावेळची दृश्ये आहेत. या फोटोसोबत जोडलेली १६९ कोरोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले सांगणारे टेक्स्ट निव्वळ अफवा आहे.

आपणास असे काही भीतीदायक दावे करणारे व्हायरल मेसेज, फोटोज, व्हिडीओज आले तर ‘चेकपोस्ट मराठी’ला निःसंकोचपणे पाठवा.

हेही वाचा:‘स्मोकर्स लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका’ WHOने सांगितली स्पष्ट कारणे

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा