Press "Enter" to skip to content

नरेंद्र मोदी आणि अमित शहा बंगालच्या निवडणूक प्रचारासाठी वेश्यावस्तीत फिरले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल निवडणूक प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निकराचा लढा देण्यासाठी चांगलीच कंबर कसलीय. याच दरम्यान या दोहोंनी प्रचारासाठी अगदी वेश्यावस्तीसुद्धा सोडली नाही (Narendra Modi and Amit Shah campaigning in sonagachi) असे दावे करणारे फोटोज सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement

कॉंग्रेस पक्षाशी संबधित असल्याचे आपल्या ट्विटर बायोमध्ये लिहिणाऱ्या अंजली सिंह राजपूत यांनी सदर फोटोज ट्विट केले आहेत आणि त्यास ‘बहारों फूल बरसाओ हम सोनागाछी में पधारे हैं..!’ असे कॅप्शन दिले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रचारासाठी वेश्यावस्तीत फिरल्याचे सांगून त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला जातोय.

अर्काइव्ह लिंक

आशिया खंडातील सर्वात मोठी वेश्या वस्ती असलेल्या सोनागाछी येथे मोदी शहा जोडी प्रचारासाठी गेल्याचे दावे (Narendra Modi and Amit Shah campaigning in sonagachi) करणाऱ्या अनेक पोस्ट्स सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी व्हायरल फोटोज रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले. यात दोन्ही फोटोज एडीट केले असल्याचे लक्षात आले.

१. नरेंद्र मोदी यांच्या फोटोची सत्यता:

पहिला फोटो ज्यामध्ये नरेंद्र मोदी दिसत आहेत, त्यातील वेश्या असणाऱ्या महिलांचा फोटो २०१६ सालच्या एका ब्लॉगमध्ये आम्हाला सापडला. या फोटोतील दरवाजाच्या ठिकाणी मोदींचा फोटो एडीट करून लावला असल्याचे सहज लक्षात येईल.

Source: dailiyo.in

२. अमित शहा यांच्या फोटोची सत्यता:

अमित शहा यांचा व्हायरल फोटो सोनागाछी येथील नसून भवानीपूर भागातील आहे. तो मूळ फोटो शहा यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ९ एप्रिल रोजी ट्विट केला गेलाय.

व्हायरल फोटोमध्ये भिंतीवर दिसत असलेला ‘रूम नंबर १३ सविता राणी सोनागाछी’ असे लिहिलेला कागद मूळ फोटोमध्ये नाहीये. किंबहुना फोटो बारकाईने पाहिल्यास सहज लक्षात येईल की भिंत आणि त्या कागदाची दिशा अगदीच वेगळी आहे. फोटोशॉप करतानाची चूक आपण सहज ओळखू शकतो.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल फोटोज एडीट केले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा वेश्या व्यवसायात जाऊन प्रचार करत असल्याचे संगणारे व्हायरल दावे निराधार आहेत.

हे ही वाचा: हिंदूंना शिवीगाळ करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अरबाज खानला जमावाकडून चोप?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा