Press "Enter" to skip to content

मोहन भागवतांनी ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील श्रद्धा संपली’ असे वक्तव्य केलेच नाही, ते व्हायरल कात्रण फेक!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे वृत्तपत्रातील कात्रण सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. यामध्ये ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील श्रद्धा संपली’ असे भागवत म्हणतायेत. यात ते मंदिरा ऐवजी शाळा आणि दवाखान्यांची तर पुजाऱ्याऐवजी शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्सची गरज असल्याचे म्हणत आहेत. (RSS Mohan Bhagwat lost faith on religion)

Advertisement

हे वृत्तपत्राचे कात्रण काही लोक आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसला सुद्धा ते कात्रण ठेवत असल्याचे आढळले. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक गुरुप्रसाद पाटील यांनी या कात्रणाच्या सत्यतेची पडताळणी करण्याची विनंती केलीय.

Source: Whatsapp

पडताळणी:

मोहन भागवत यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्याची लक्षणे आढळून येताच नागपूरच्या किंग्सवे हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले. आठ दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. याविषयीच्या बातम्या १६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत.

हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख, सनातन धर्माचा पुरस्कार करणारी व्यक्ती कोरोनाची लक्षणे आढळल्यावर अत्याधुनिक उपचारपद्धती असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि मग असे काही कात्रण व्हायरल होते. त्यामुळे (RSS Mohan Bhagwat lost faith in religion) ते खरे असण्याची शक्यता असावी म्हणून कैक लोक दुर्लक्ष करू शकतात. तरीही आम्ही पडताळणी करून पाहिली.

व्हायरल कात्रण जुनेच:

सर्वात आधी आम्ही व्हायरल कात्रणातील मजकूर व्यवस्थित वाचून पाहिला तेव्हा असे लक्षात आले की यामध्ये “कोरोना पिडीतोंकी संख्या २५ हजार से ज्यादा हो गयी है |” असा उल्लेख केला गेलाय. परंतु सद्यस्थितीमध्ये भारताची ही संख्या १ कोटी ४३ लाख एवढी आहे. याचा अर्थ असा की हे कात्रण जुने असावे. हे शोधण्यासाठी आम्ही गुगल सर्च केले तेव्हा लक्षात आले की ते (RSS Mohan Bhagwat lost faith in religion) कात्रण मागच्या वर्षी मे महिन्यात सुद्धा व्हायरल झाले होते.

भागवतांनी असे वक्तव्य केले होते?

साधारण २६ एप्रिल २०२०च्या दरम्यान भारतातील कोरोना रुग्णांची संख्या २५ हजारच्या वर गेली होती. याच काळात सरसंघचालकांनी त्यांच्या स्वयंसेवकांना संबोधित केले होते. ते भाषण आम्हाला संघाच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर मिळाले, ते संपूर्ण भाषण आम्ही ऐकले यातही भागवतांनी व्हायरल कात्रणात नमूद केलेले वक्तव्य केले नाही. यामध्ये त्यांनी स्वयंसेवकांची, नागरिकांची भूमिका काय असायला हवी याविषयी सांगितले आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी, स्वदेशी गोष्टी वापरण्यासाठी ते आग्रही आहेत.

इतरही विविध कीवर्ड्सच्या आधारे आम्ही शोधाशोध केली परंतु भागवतांनी ‘कोरोनामुळे धर्मावरील विश्वास उडाल्याचे’ वक्तव्य कुठे केल्याचा पुरावा मिळाला नाही. या उलट रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख असलेल्या नरेंद्र कुमार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (RSS Mohan Bhagwat lost faith in religion) व्हायरल कात्रण फेक असल्याचे सांगत हे अनास्था, अराजक आणि समाजाला तोडण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हंटले आहे.

रा.स्व.संघ के पू.सरसंघचालक @DrMohanBhagwat जी के नाम पर सोशल मीडिया में एक फेक न्यूज़ चल रही है।पू.सरसंघचालक जी ने ऐसा कोई वक्तव्य नहीं दिया है। यह समाज तोड़ने वाली शक्तियों का अपने लक्ष्यों की प्राप्ति के लिए समाज में अनास्था, अराजकता और समाज विघटन के प्रयास का एक षड्यंत्र है ।

– नरेंद्र कुमार (रा. स्व. संघ अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख)

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये (RSS Mohan Bhagwat lost faith in religion) व्हायरल कात्रण फेक असल्याचे सिद्ध झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कधीही ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील श्रद्धा संपली’ असे वक्तव्य केले नाही. ना त्यांनी कधी मंदिरा ऐवजी शाळा आणि दवाखान्यांची तर पुजाऱ्याऐवजी शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्सची गरज असल्याचे सांगितले.

हेही वाचा: अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबाचं जनसंघ, RSS कनेक्शन खरंय का?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा