Press "Enter" to skip to content

राणीच्या बागेचे नाव आता ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे बदलण्यात आल्याचे दावे फेक!

मुंबईतील राणीच्या बागेचे (Rani Bagh) नाव आता ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे करण्यात आल्याचे सांगत ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे कोरलेल्या काळ्या ग्रॅनाईटबोर्डचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement
https://twitter.com/marathikedar/status/1473157660165881857?t=iZ4SWXZhmvpgZgQgdwwKbA&s=19

फेसबुकवरही हे दावे खूप मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Source: Facebook

‘कचेकपोस्ट मराठी’चे वाचक अजय कदम, सतीश सांगळे, यश गोखले आणि अजय सावंत यांनी व्हॉट्सअपवर व्हायरल होणारे हे दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

source: whatsapp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला असता आमच्या समोर ही माहिती आली की सदर उद्यान १८६१ साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळात तयार झाले आहे. सुरुवातीला या उद्यानाचे नाव ‘व्हिक्टोरिया गार्डन’ (Victoria Garden) असे होते, त्यास मराठी लोक ‘राणीचा बाग’ असे म्हणत. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात याचे नामांतर ‘वीरमाता जिजाबाई उद्यान’ असे करण्यात आले. सदर माहिती ‘mumbai.org.uk‘ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

उद्यानाचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे करण्यात आले आहे का?

व्हायरल दावा किती खरा हे शोधत असताना कालच म्हणजे 20 डिसेंबर रोजी अपलोड करण्यात आलेला एक युट्युब व्हिडीओ आम्हाला सापडला. यामध्ये उद्यानाच्या प्रवेशद्वारावर स्पष्टपणे ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असे लिहिल्याचे दिसले.

तसेच व्हिडिओमध्ये उद्यान प्रवेशासाठी काढण्यात आलेले तिकीट देखील दाखवले आहे. यावरही ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असेच लिहिले आहे. सदर तिकिटावरील तारीख 13/12/2021 अशी आहे. म्हणजेच मागच्याच आठवड्यात हा व्हिडीओ शूट केलेला आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौरांची प्रतिक्रिया:

हे उद्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. व्हायरल दाव्यांविषयी महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी आम्ही संवाद साधला असता त्या म्हणाल्या:

“उद्यानाचे नाव बदलले असल्याचे सांगणारे व्हायरल दावे तद्दन फेक आहेत. तसेच या उद्यान परिसरात ‘हजरत हाजी पीर बाबा’ यांचा दर्गा अनेक वर्षांपासून आहे. नेमके साल सांगता येणार नाही पण त्याचे स्थान अनेक वर्षांपासून तेच आहे. मुळात या दर्ग्यात हिंदू मुस्लिम सर्वच लोक माथा टेकवतात त्यामुळे या सौहार्दाच्या ठिकाणास उगाच धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचं काम आमचे विरोधक करत आहेत. उद्यानाचे नाव वीरमाता जिजाऊंच्या नावेच आहे आणि भविष्यात राहील.”

– किशोरी पेडणेकर, महापौर- बृहन्मुंबई महानगर पालिका

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की राणीच्या बागेचे नाव आता ‘हजरत पीर बाबा राणी बाग’ असे बदलण्यात आलेले नाही. उद्यानाचे नाव ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असेच आहे. म्हणजेच व्हायरल दावे फेक आहेत.

हेही वाचा: ठाकरे सरकारने 10 वी, 12 वी परीक्षेच्या फॉर्मवरील ‘हिंदू’ शब्द काढून टाकलाय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

  1. Anonymous Anonymous December 21, 2021

    रानी बागेत आत मध्ये जिथे दर्गा आहे त्याच्या जवळ हेआहे।

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा