Press "Enter" to skip to content

कर्नाटकातील शिमोगा येथे भारतीय ‘तिरंगा’ हटवून ‘भगवा ध्वज’ फडकवण्यात आल्याचे दावे चुकीचे!

कर्नाटकातील हिजाब बंदीच्या (Hijab Ban) वादाला उग्र स्वरूप प्राप्त झाले असून शिमोगा येथे प्रकरणाला हिंसक वळण देखील लागले आहे. दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा खांबावर चढून भगवा ध्वज (Saffron Flag) फडकावतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की या विद्यार्थ्याने ‘तिरंगा’ हटवून त्या ठिकाणी ‘भगवा’ फडकावला आहे.

Advertisement

काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार (D.K. Shivkumar) यांनी ट्विटरवरून तिरंग्याच्या ठिकाणी भगवा फडकविण्यात आल्याचा दावा दावा केला होता. शिवकुमार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की कर्नाटकातील काही शैक्षणिक संस्थांमधील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की एका ठिकाणी राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज फडकविण्यात आला आहे. मला वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी या संस्था आठवडाभरासाठी ठेवायला हव्यात.

अर्काइव्ह

सोशल मीडियावर देखील अनेकांकडून हा व्हिडीओ अशाच प्रकारच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थी खांबावर चढून भगवा ध्वज फडकावत असल्याचे दिसतेय. मात्र यात कुठेही तिरंगा उतरविण्यात आल्याचे बघायला मिळत नाही. त्यामुळे व्हायरल दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही सदर घटना घडलेल्या गवर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेजचे प्राचार्य धनंजय बीआर यांच्याशी संपर्क साधला.

धनंजय बीआर यांनी दिलेल्या माहितीनुसार,

“ज्यावेळी भगवा ध्वज फडकविण्यात आला त्यापूर्वी ध्वज स्तंभावर कुठलाही झेंडा नव्हता. त्यामुळे तिरंगा ध्वज उतरवून भगवा फडकविण्यात आला असे म्हणणे चुकीचे ठरेल. विद्यार्थ्यांनी रिकाम्या स्तंभावर भगवा फडकावला. कॉलेजमध्ये शेवटच्या वेळी तिरंगा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी रोजी फडकविण्यात आला होता आणि त्याच दिवशी सायंकाळच्या वेळी तो उतरविण्यात देखील आला. त्यानंतर कॉलेजमध्ये कुठलाही ध्वज फडकविण्यात आला नव्हता.”

– प्राचार्य धनंजय बीआर, गवर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज

घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकारांकडून देखील अशीच माहिती मिळतेय की ज्यावेळी भगवा फडकावला गेला त्यावेळी ध्वज खांबावर तिरंगा किंवा इतरही कुठला झेंडा नव्हता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की कर्नाटकातील शिमोगा येथे विद्यार्थ्यांनी तिरंगा हटवून त्याठिकाणी भगवा ध्वज फडकावल्याचे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत. भगवा ध्वज फडकविण्यात आला त्यापूर्वी ध्वज स्तंभावर कुठलाही ध्वज नव्हता.

हेही वाचा- गुगल हॅक करणाऱ्या ऋतुराज चौधरीला गुगलकडून 3.66 कोटींच्या पॅकेजची नोकरी मिळाल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा