Press "Enter" to skip to content

पद्मश्री विजेत्या कवीकडे पुरस्कार घ्यायला दिल्लीला जाण्यासाठी नव्हते पैसे? वाचा सत्य!

संबलपुरी आणि कोसली भाषेतील प्रसिद्ध कवी पद्मश्री हलधर नाग (Haldhar Nag) यांच्याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतेय. दावा करण्यात येतोय की त्यांच्याकडे पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला दिल्लीला जाण्यासाठी देखील पैसे नव्हते. यासंदर्भात नाग यांनी सरकारला पत्र लिहिले आणि आपला पुरस्कार पोस्टाने पाठविण्याची विनंती केली.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टची सत्यता पडताळण्यासाठी किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता ‘जागरण’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार हलधर नाग यांनी स्वतः सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

Halzar Nag said viral posts are fake

हलधर नाग यांनी सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांच्या संदर्भात नाराजी व्यक्त करताना हे दावे पूर्णतः चुकीचे आणि काल्पनिक असल्याचे सांगितले आहे. हलधर नाग यांना यावर्षी नव्हे तर 2016 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. मात्र त्यावेळी देखील आपण सरकारकडे गरिबीचे कारण देत पुरस्कार पोस्टाने पाठविण्याची विनंती केली नव्हती, असे नाग सांगतात.

नाग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीपासून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्याकडून त्यांना कलाकार भत्ता दिला जात आहे. ओडिशा सरकारने त्यांना राहण्यासाठी जमीन दिली आहे, ज्यावर बारगढ येथील एका डॉक्टरने स्वखर्चाने घरही बांधले आहे. त्यांना सरकारकडून 18,000 रुपये मासिक भत्ताही मिळतो.

‘जागरण’शी बोलताना डॉ.नाग म्हणाले की, 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांना केंद्र सरकारकडून सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या. आपल्याला कारने रायपूरला नेण्यात आले आणि तेथून विमानाने दिल्लीला नेल्यानंतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान ओडिशा केडरच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी उषा पाधी आणि अरविंद पाधी यांनी विशेष सहकार्य केले होते.

व्हायरल पोस्टबद्दल खंत व्यक्त करताना ते म्हणाले की, सध्या सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अनेक पोस्ट शेअर केल्या जाताहेत. कधी पाणी-भात खाताना दाखवून, कधी आवाजाची नक्कल करून तर कधी हरभरा विकत असल्याचे सांगून बदनामी केली जात आहे. अशा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पद्मश्री विजेते कवी हलधर नाग यांच्यासंदर्भातील सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. स्वतः हलधर नाग यांनीच हे दावे चुकीचे असल्याचे सांगून अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा–  ५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा